Tuesday, April 22, 2025
Homeक्राईमधक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार?...

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल

भायंदर : उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जलतरण शिबिरात दाखल झालेल्या एका ११ वर्षांच्या मुलाचा जलतरण तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी भायंदर पूर्वेतील गोल्डन नेस्ट भागात, महापालिकेच्या मालकीच्या परंतु खाजगी संस्थेकडे व्यवस्थापन असलेल्या क्रीडा संकुलात घडली.

या प्रकरणी नवघर पोलिसांनी क्रीडा संकुल व्यवस्थापन आणि चार जलतरण प्रशिक्षकांविरोधात हलगर्जीपणामुळे मृत्यू असा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, उन्हाळी शिबिराच्या आयोजनात नेमकं कोण कुठे जबाबदार होतं, याचा शोध घेतला जात आहे. तलाव परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे.

तर माझ्या मुलाचे प्राण वाचले असते..

मृत मुलाचे नाव ग्रंथ मुथा (११) असे आहे. त्याचे वडील हसमुख मुथा यांनी व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “माझ्या मुलाचा मृत्यू मला थेट रुग्णालयात गेल्यावर कळला. जर त्याचवेळी तलावातून बाहेर काढून तिथेच तातडीने उपचार दिले गेले असते, तर माझ्या मुलाचे प्राण वाचले असते.”

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

ते पुढे म्हणाले, “माझा मुलगा गेल्या आठवड्यात जलतरण वर्गात दाखल झाला होता. बॅच सकाळी ११ वाजता सुरु होते. अंदाजे ११.४५ ते १२ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली असावी. १२.१५ ला मला एका मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की तातडीने तुंगा रुग्णालयात ये. तिथे गेल्यावरच मला समजलं की ग्रंथ आपल्यात राहिला नाही.”

ही घटना केवळ एक अपघात नव्हता, तर व्यवस्थेतील सुरक्षेच्या ढिसाळपणाचा गंभीर परिणाम होता, हे स्पष्ट दिसून येत आहे. खासगी संस्थेकडे सोपवलेली जबाबदारी आणि त्यानंतरही सुरक्षा उपाययोजनांची घोर अनुपस्थिती यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू

याआधीही घडल्या आहेत निष्काळजीपणाच्या दुर्दैवी घटना

दरम्यान, शनिवारीही पालघर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांना आफला जीव गमवावा लागला. मासवण गावाजवळील सूर्या धरणात पोहण्यासाठी गेलेला अभिषेक बि-हाडे (२४) हा गढूळ पाण्यात खोल गेला आणि बुडाला. दुसऱ्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी गावचा सागर मर्डे (१८) हा कालव्यात पोहताना वाहून गेला. त्याचे प्रेत तब्बल १०० मीटर दूर सापडले.

जलतरण तलावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या सलग घटनांनी पुन्हा एकदा जलतरण प्रशिक्षण वर्ग आणि नैसर्गिक जलस्त्रोतांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासन आणि आयोजकांच्या ढिलाईवर संताप व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर पालकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. बहुतांश पालकांनी सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, प्रशिक्षकांचे दुर्लक्ष आणि अपात्कालीन वैद्यकीय सुविधेची कमतरता या गोष्टींवर चिंता व्यक्त केली आहे.

या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा जलतरण तलावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांनी जलतरण शिकवणाऱ्या संस्थांची पारदर्शकता, कर्मचारी प्रमाणपत्रे आणि सुरक्षा उपाय योजना नीट तपासूनच मुलांना शिबिरात सहभागी करावे, ही काळाची गरज आहे.

#SwimmingAccident #BhayanadarNews #ChildDrownsInPool #GranthMutha #CivicNegligence

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -