मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात
मुंबई : “राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने परदेशात जाऊन भारताची, लोकशाही संस्था आणि संविधानाची बदनामी करत आहेत. निवडणुकीत सातत्याने पराभूत झाल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालाय,” अशी थेट टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाचा नेता म्हणून जर कोणी परदेशात जाऊन देशाचं नाव खराब करत असेल, तर तो कोणाचा अजेंडा राबवतोय, हा संशय निर्माण होतो. त्यांना पराभव पचलेला नाही, म्हणून राहुल गांधी निवडणूक प्रक्रिया आणि मतदार यादीवरच प्रश्न उपस्थित करत आहेत. हा केवळ बालिशपणा आहे.”
ते पुढे म्हणाले, “राहुल गांधींनी देशात राहून काम करावं, जनतेत विश्वासार्हता निर्माण करावी. परदेशात फिरून भारताची निंदा करून मते मिळणार नाहीत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, कुठेही त्यांना यश मिळालेलं नाही. आता तरी त्यांनी भारताची बदनामी करणं थांबवावं.”
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप
दरम्यान, भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनीही राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं, “राहुल गांधी हे लोकशाहीविरोधी आहेत. जे भारतीय मतदारांचा विश्वास जिंकू शकले नाहीत, तेच लोक परदेशातून भारताच्या लोकशाही प्रक्रियेवर प्रश्न उभे करत आहेत. जॉर्ज सोरोसच्या अजेंड्यावर राहुल गांधी काम करतायत का?”