व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले. पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी झाल्याची अधिकृत घोषणा व्हॅटिकन सिटीतील रोमन कॅथलिक चर्चने केली आहे. आता परंपरेनुसार पुढील विधी केले जातील. या निमित्ताने जाणून घेऊ की, पोप फ्रान्सिस आपल्या मागे किती मोठी संपत्ती सोडून गेले आहेत.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोप म्हणून कार्यभार हाती घेतला. त्यांनी पोप असतानाच्या काळात चर्चकडून कधीही पगार मागितला किंवा घेतला नाही. चर्च त्यांच्या पगाराएवढी रक्कम विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यांसाठी दान करत होते. पोप फ्रान्सिस यांना दरमहा २७.३२ लाख रुपये एवढा पगार होता. ही रक्कम नियमितपणे विविध सामाजिक कार्यांसाठी वापरली जात होत होती.
पगार घेतला नाही तरी पोप फ्रान्सिस यांची वैयक्तिक संपत्ती पाच लक्झरी कारसह १३७ कोटी रुपये होती. पोप फ्रान्सिस यांचा जन्म लॅटिन अमेरिकेतील अर्जेंटिना या देशात झाला होता. त्यांचे नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लियो असे होते. पण २०१३ मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी सततच्या आजारपणामुळे राजीनामा दिला. यानंतर पोप फ्रान्सिस यांनी सूत्रं हाती घेतली. त्यांनी पोप होण्याच्या आधीही कधी चर्चकडून एक नवा पैसा स्वतःसाठी म्हणून घेतला नव्हता. पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. त्यांची वैयक्तिक संपत्तीच मोठी होती. या संपत्तीमुळेच त्यांनी अखेरपर्यंत धार्मिक कार्यासाठी चर्चकडून पैसे घेतले नव्हते.
पोप फ्रान्सिस यांनी चर्चकडून पैसे घेतले नाही. ते कायम साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाचे पालन करत होते. पण रोमन कॅथलिक चर्च हे प्रचंड श्रीमंत आहे. जगभर त्यांच्या मालकीची अफाट संपत्ती आहे.