पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८ व्या वर्षी निधन झाले. जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिशन धर्माच्या सर्वात मोठ्या शाखेचे ते सर्वोच्च धार्मिक नेते होते. पोप फ्रान्सिस हे जगभरातील १.४ अब्ज लोकांचे आध्यात्मिक प्रमुख होते. पोप फ्रान्सिस हे २०१३ मध्ये पोप झाले, तेव्हापासून त्यांनी नम्रता, काळजी आणि सुधारणा यावर लक्ष केंद्रीत करून मार्गदर्शन केले. ते रविवारी २० एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचीही भेट घेतली होती.







मागील अनेक दिवसांपासून पोप फ्रान्सिस आजारी होते. अखेर सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याआधी ३ मार्च रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते परतले होते. श्वसनाचा विकार झाला असल्यामुळे नियमित पुरेशी विश्रांती घेण्याचा, सात्विक आहार घेण्याचा आणि औषधे नियमित घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी पोप यांना दिला होता.



पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी झाल्याची अधिकृत घोषणा व्हॅटिकन सिटीतील रोमन कॅथलिक चर्चने केली आहे. आता परंपरेनुसार पुढील विधी केले जातील. पोपचे शरीर त्यांच्या खाजगी चॅपलमध्ये हलवले आहे. त्यांच्या देहाला पांढऱ्या रंगाचा कॅसॉक घातला जाईल. जस्त आणि लाकूड यांचा वापर करुन तयार केलेल्या शवपेटीत पोप यांचे पार्थिव ठेवले जाईल. व्हॅटिकनच्या पद्धतींनुसार त्यांचे पायमोजणी आणि पॅलियम आदरपूर्वक बाजूला ठेवले जाईल. नंतर पोप यांच्या देहाला लाल रंगाचा विशेष वेष घातला जाईल. पोपची अधिकृत सही विशिष्ट पद्धतीने तोडली जाईल.

पोप फ्रान्सिस यांचा मृत्यू झाला असल्यामुळे व्हॅटिकन नऊ दिवसांचा शोक जाहीर करेल तर इटली राष्ट्रीय शोक जाहीर करेल. यानंतर पुढील धार्मिक विधी सुरू होतील. पोपचे अंत्यसंस्कार हे मृत्यूनंतर काह दिवसांनी केले जातात. हे सर्व परंपरेनुसार होईल. पोपच्या निधनानंतर साधारण १५ ते २० दिवसांनी कॉलेज ऑफ कार्डिनल्सची बैठक होईल. या बैठकीत नव्या पोपची निवड केली जाईल.
Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

थायलंड  : बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान

मेट्रोत झोपलात, तर भरावा लागेल हजारोंचा दंड!

दुबई  : दररोज असंख्य लोक रेल्वेप्रमाणेच मेट्रोने प्रवास करतात आणि प्रवास म्हटलं की थोडी झोप आलीच. पण मेट्रो

‘मांजरांचे बेट’ अशी ओळख असलेलं अनोखं ठिकाणं

टोकियो  : जगात अनेक रहस्यमय आणि अनोखी ठिकाणे आहेत; पण जपानमधील एका बेटाने आपल्या वैशिष्ट्यांमुळे पर्यटकांना

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक अनुभवाची संधी! युनेस्कोचा इंटर्नशिप प्रोग्राम, आताच करा अर्ज

भारतीय युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. युनेस्कोने

भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार!

काबूल : भारतानंतर आता तालिबानशासित अफगाणिस्तान पाकिस्तानला होणारा पाणीपुरवठा मर्यादित करण्याची आणि नदीवर धरणे

रशियातील महत्त्वाच्या दोन तेल कंपन्यांवर ट्रम्पचे निर्बंध, रशियावर येणार आर्थिक दबाव! भारतालाही बसणार का फटका?

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.