Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीOppo K13 5G : अक्षय तृतीयेपूर्वीच ओप्पोने लाँच केला 7000mAh बॅटरी व...

Oppo K13 5G : अक्षय तृतीयेपूर्वीच ओप्पोने लाँच केला 7000mAh बॅटरी व AI फिचर असलेला नवा फोन; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन मोबाईल घेऊ पाहत असाल तर, ओप्पोने भारतीय बाजारात नवा फोन लाँच केला आहे. या फोन मध्ये ग्राहकांना अधिक अपडेट झालेले AI फिचर पाहायला मिळणार आहेत. ग्राहकांना परवडेल अशा दरात ओप्पोने हा नवा फोन भारतात आणला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बाजारात Oppo K13 5G या फोनची चर्चा सुरु होती. Oppo K13 5G च्या फीचर्स आणि त्याची भारतीय किंमत सविस्तर जाणून घेऊया.

Elon Musk’s Mother : एलॉन मस्क यांच्या आईने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; सोबत होती ‘ही’ अभिनेत्री!

या फोनची भारतीय किंमत काय आहे ?

Oppo चा हा 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह येतो, जो १७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये आहे. हा फोन आइस पर्पल आणि प्रिझम ब्लॅक या दोन रंगांमध्ये आणण्यात आला आहे.

या फोनची विक्री २५ एप्रिल पासून सुरू होणार आहे. पहिल्या सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्यास १००० रुपयांची त्वरित सूट देण्यात येणार आहे. ही ऑफर केवळ HDFC आणि SBI कार्डद्वारे पेमेंट केल्यास मिळणार आहे.

Oppo K13 5G फोनचे आकर्षित फीचर्स कोणते ?

प्रोसेसर आणि स्टोरेज

उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 4 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.

बॅटरी

Oppo K13 5G स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी आहे. हा फोन 80W Super VOC चार्जिंगला सपोर्ट करतो. ही बॅटरी ३० मिनिटांत ६२% पर्यंत चार्ज होते. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षिततेसाठी फोनला IP65 रेटिंग देण्यात आले आहे. या फोनसोबत चार्जर देखील मिळणार असल्याचं समजत आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Oppo K13 5G फोनच्या मागील बाजूस 50MP चा मुख्य AI कॅमेरा आणि 2MP चा दुसरा सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हँडसेटमध्ये 16MP कॅमेरा आहे. त्यात स्क्रीन ट्रान्सलेटर, AI रायटर, AI समरी, AI क्लॅरिटी एन्हांसर, AI अनब्लर, AI रिफ्लेक्शन रिमूव्हर आणि AI इरेजर सारखे अनेक AI फीचर्स देखील दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -