Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा


मुंबई (प्रतिनिधी) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी केली. उत्तर मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पीयूष गोयल यांनी महापालिका, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, पोलिस अशा सर्वच विभागाच्या उच्वपदस्थ अधिकाऱ्यांची चौथी आढावा बैठक शनिवारी महापालिकेच्या आर मध्य विभाग -65% कार्यालयात घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व कामांच्या प्रगतीची माहिती दिली. त्यावेळी मिनी ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली.


मिनी ट्रेनवायत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार वर्षभरापूर्वी सुरू झालेले मिनी ट्रेनचे काम पूर्ण होऊन दोन महिन्यात मिनी ट्रेन धावू लागेल, अशी माहिती गोयल यांनी यावेळी दिली, गोयल यांनी यावेळी उत्तर मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. रस्तेनोडणी, पूल, सागरी महामार्ग अशा प्रकल्पांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. पोयसर आणि दहिसर नद्यांच्या पात्रांच्या रुंदीकरणसह नालेसफाईचे काम २५ टक्के पूर्ण झाले असून त्यासोबत उत्तर मुंबईतील चार विभाग कार्यालयांच्या अंतर्गत सुरू असलेली २१२ रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे पीयूष गोयल यांनी सांगितले, त्याचवेळी कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात याच्यात, अशीही सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला केली. मालाड येथील मालवणी परिसरात अहोरात्र ट्रकद्वारे भरणी करून अतिक्रमण केले जात आहे.


या ट्रकविरोधात आणि अतिक्रमणाविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस बळ तैनात करण्यात यावे तसेच अंबुजवाडी आणि आक्सा येथे दोन नवी पोलीस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले, उत्तर मुंबईत अकरा तलाव असून त्यात भरणी करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेत पुढील दोन वर्षांत त्यांचे संवर्धन आणि सौंदर्याकरण करण्यात येणार असल्याची माहिती पीयूष गोयल यांनी दिली.

Comments
Add Comment