मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कैपिटल संघाचा सात बळीनी पराभव केला. सलामीला कर्णधार शुभमन गिल लवकर बाद झाल्यानंतर जॉस बटलरने सामन्यावर जी पक्कड घेतली ती अप्रतिमच होती.
आजच्या सामन्यात गुजरातला फिरकीचा सामना करावा लागणार आहे. सुनील नारायणन व वरुण चक्रवर्ती हे दोन्ही गोलंदाज गुजरातच्या फलंदाजाना रोखू शकतात. अगोदरच्या सामन्यात या दोघांनी पंजाबच्या फलंदाजाना १११ रोखण्याचा पराक्रम केला, परंतु त्यांना तो सामना जिंकता आला नाही. आजचा सामना जिंकायचा असेल तर कोलकत्ताला फलंदाजीवर भर द्यावा लागेल.
कोलकत्त्याच्या फलंदाजीमध्ये सातत्य नसल्यामुळे हा संघ अडचणीत येतो. एकही फलंदाज सातत्याने खेळतो असे दिसत नाही. कोलकत्ताचे हिटर फलंदाज आंद्रे रसेल व व्यंकटेश अय्यर संघासाठी पूर्ण जबाबदारीने खेळत नाही आहेत. आजचा सामना जिंकायचा असेल तर या दोघानाही पूर्ण ताकदीने खेळावे लागेल. गुजरातची फिरकी इडन गार्डनवर काय पराक्रम करते हे पाहणेही महत्वाचे आहे. चला तर बघूया घरच्या मैदानावर कोलकत्ता गुजरातला रोखते का?