मुंबई : छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलची आणि त्याच्या पत्नीची सर्वत्र चर्चा असते. विकी कौशलने अवघ्या महाराष्ट्राचे मन जिंकले आहे. त्याची पत्नी कतरीना कैफबरोबर तो नेहमीच दिसून येतो. सध्या कतरीनाच्या मैत्रिणीच्या लग्नातील जोडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिने तिचा नवरा अभिनेता विकी कौशलवरचे प्रेम सुंदरपणे व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.
KDMC News : कल्याण – टिटवाळा भागात उद्या पाणी येणार नाही; दोन दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवा!
विकी आणि कतरिनाने तिची मैत्रीण करिश्मा कोहलीच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. तिथे त्यांनी एकमेकांसोबत सुंदर फोटो काढले. या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये कतरीना आणि विकी कौशल एकमेकांसोबत सुंदर क्षण घालवताना दिसत आहेत. कतरिनाने मैत्रिणीच्या लग्नात न्यूड मेकप आणि गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला आहे. त्यामुळे तिच्या दंडावर काढलेल्या मेहंदीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. कतरिनाने तिच्या उजव्या दंडावर मेहंदीने VK असं गोंदवल आहे. या मेहेंदीवरून कतरिनाच विकी कौशलवर असलेलं प्रेम दिसून आलं. दरम्यान नेटकऱ्यांनीही कतरिनाच्या या दिलखेचक अंदाजाच कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
कतरिना आणि विकी यांचे लग्न २०२१ मध्ये झाले. लग्नापूर्वी या जोडप्याने त्यांचे नाते खूप गुप्त ठेवले होते. मात्र आता ते सर्व सणसमारंभात दिसून येतात. तसेच दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात.