मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात टॉस जिंकत कोलकाताने गुजरातला पहिल्यांदा फलंदाजीचे निमंत्रण दिले आहे. मात्र टॉरसच्या वेळेस गुजरातचा कर्णधार शुभमन गिलच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?
टॉस दरम्यान न्यूझीलंडचे माजी खेळाडू डॅनी मॉरिसनने गिलला विचारले की तु खूप हँडसम दिसत आहेत. लग्नाची तयारी आहे का? यावर शुभमन गिल लाजला आणि हसत त्याने सांगितले की नाही, असे काही नाही.
Danny Morrison – You’re looking good, wedding bells around the corner? Getting married soon?
Shubman Gill – No, nothing like that. pic.twitter.com/2wtfF2HmN0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2025
सध्याच्या आयपीएलच्या हंगामात गुजरात टायटन्सची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यांनी आतापर्यंत सात सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे केकेआरला गेल्या सामन्यात पराभवास सामोरे जावे लागे. त्यांचा संघ मुल्लांपूरमध्ये पंजाब किंग्सविरुद्ध ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९५ धावांवर बाद झाला.