“राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत का.. ?” उच्च न्यायालयाने मागितले केंद्र सरकारला उत्तर

उच्च न्यायालयाने मागितले केंद्र सरकारला उत्तर


लखनऊ : राहुल गांधी भारताचे नागरिक आहेत का ? याबाबत 10 दिवसात उत्तर सादर करा असे निर्देश अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज, सोमवारी दिलेत. राहुल गांधींच्या नागरिकत्त्वाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिलेत.


राहुल गांधींकडे भारत आणि ब्रिटन, असे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप आहे. अनेक वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारला राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल आणि 10 दिवसांच्या आत न्यायालयाला कळवावे लागेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या नागरिकत्त्वासंदर्भात केंद्र सरकारने सोमवार एक स्टेटस रिपोर्ट दाखल केला. पण न्यायालयाने त्याला पुरेसे मानले नाही. याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, राहुल गांधी यांचे नागरिकत्व संशयास्पद आहे. या आधारावर त्यांच्या लोकसभा सदस्यत्वालाही आव्हान देण्यात आले आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने केंद्र सरकारला 10 दिवसांच्या आत तथ्यांसह उत्तर देण्यास सांगितले आहे.


विशेष म्हणजे, 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचे आरोप फेटाळून लावले होते. कंपनीच्या कागदपत्रांमध्ये केवळ ब्रिटिश नागरिकत्वाचा उल्लेख केल्याने राहुल गांधी ब्रिटिश नागरिक ठरत नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर 2024 आणि 2025 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. याचिकाकर्ते एस. विघ्नेश शिशिर यांनी दावा केला की, त्यांच्याकडे ब्रिटिश सरकारची कागदपत्रे आणि ईमेल आहेत, जे राहुल गांधींचे ब्रिटिश नागरिकत्व सिद्ध करतात.

Comments
Add Comment

Delhi CJP Protest : दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनात होते माओवादी, जनसंघर्ष समितीचा आरोप

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

Supreme Court : गळफास पद्धतीने दिली जाणारी फाशीची शिक्षा रद्द होणार नाही, पण... सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले ?

नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी गळफास देण्याची (फाशीची) सध्याची पद्धत रद्द करण्याची

Cockroach Janata Party : सीजेपी आंदोलकांवर 'जास्तीत जास्त संयम आणि किमान बळाचा' वापर

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha