मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे. या अशा वातावरणात जशी उन्हापासून डोक्याची आणि त्वचेची काळजी घेतो तशीच डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बरेच लोक उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालतात. सर्वच सनग्लासेस डोळ्यांचे रक्षण करण्यास सक्षम असतात असे नाही. काही जण संधीचा गैरफायदा घेऊन सनग्लासच्या नावाखाली निकृष्ट गॉगल विकण्याचाही उद्योग करतात. यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने सनग्लासेस घेणे हिताचे आहे.
उन्हाळ्याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. अशा परिस्थितीत डोळे चोळल्याने डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. सनग्लासेस डोळ्यांना सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून वाचवतात. पण लोकांना हे माहित नसतं की कोणता सनग्लास घ्यायला पाहिजे. ज्यामुळे ते चुकीचा चष्मा निवडतात. यामुळे आराम मिळण्याऐवजी डोळ्यांना इजा होते.
साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत
कोणते सनग्लासेस घालावे?
उन्हाळ्यात सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो. तेजस्वी सूर्यप्रकाशात अतिनील किरणे देखील असतात. या किरणांमुळे डोळ्यांच्या आरोग्याला गंभीर नुकसान होते. या किरणांपासून बचाव करण्यासाठी, चांगल्या दर्जाचे यूव्ही संरक्षित सनग्लासेस वापरावेत. सनग्लासेस खरेदी करताना, तुम्ही ते पूर्णपणे तपासले पाहिजेत. असे अनेक सनग्लासेस आहेत जे फक्त दाखवण्यासाठी आहेत. असे सनग्लासेस घालण्याचा काही फायदा नाही. यासोबतच, योग्य फ्रेम निवडणे देखील महत्त्वाचे आहे. फ्रेम तुमच्या चेहऱ्यावर चांगली दिसली पाहिजे आणि तुमचे डोळे व्यवस्थित झाकले पाहिजेत.