Tuesday, April 22, 2025
Homeदेशजम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात अनेक ठिकाणी हिमवृष्टी सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी गारा पडल्या तर काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे, गारपीट, मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, निवडक ठिकाणी झालेली हिमवृष्टी यामुळे सामान्यांचे हाल होते आहेत. फळबागांचे नुकसान झाले आहे. काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात हिमवृष्टी सुरू आहे. सततच्या हिमवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा हा वाहतुकीच्यासाठी महत्त्वाचा असलेला रस्ता बंद केला आहे.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक रस्त्यांवर पावसाचा तडाखा बसल्यामुळे चिखल झाला आहे. वाहने चालवणे अशक्य झाले आहे. चालत प्रवास करणेही कठीण झाले आहे. सरकारने लोकांना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून नाशरी आणि नवयुग बोगद्यादरम्यानचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. रामबनमध्ये जमीन खचल्यामुळे महामार्गाचे नुकसान झाले आहे. महामार्ग पुन्हा कार्यरत करण्यासाठी किमान ४८ तास लागतील, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने राज्यात अनेक ठिकाणी शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

MI vs CSK Live Score, IPL 2025 :  रोहित-सूर्याचे वादळ, धोनीच्या चेन्नईवर मुंबईचा ९ विकेटनी विजय

हवामान विभागाने सोमवारी २१ एप्रिल रोजी पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये गेल्या २४ तासांत १६.४ मिमी, बडगाममध्ये १८.० मिमी आणि कुपवाडामध्ये २०.० मिमी पावसाची नोंद झाली. कोकरनाग आणि पहलगाममध्ये अनुक्रमे ३३.२ मिमी आणि २७.८ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तर काश्मीरच्या उंच भागात वसलेल्या गुलमर्गमध्ये खोऱ्यातील सर्वाधिक ३५.२ मिमी पाऊस पडला आणि येथे शून्याखालील तापमान -०.८ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदले गेले.

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार

लडाखमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. कारगिलमध्ये सर्वाधिक २६.५ सेमी हिमवृष्टी झाली. द्रास आणि पदुम दोन्ही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीची नोंद झाली. द्रासमध्ये ५ मिमी पाऊस आणि ५ सेमी हिमवृष्टी झाली. दुममध्ये ५ मिमी पाऊस आणि २ इंच (सुमारे ५ सेमी) हिमवृष्टी झाली. खलस्तेमध्ये ७.० सेमी आणि लेहमध्ये ०.५ सेमी हिमवृष्टी झाली.

वाहतूक पोलिसांनी परवाने देण्यासाठीच्या चाचण्या १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवल्याचे जाहीर केले आहे. चालकांना दिलेल्या टायमिंग स्लॉटच्या पावत्या जपून ठेवण्याचे आवाहन केले आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी वाहने कमी वेगाने पण दोन्ही बाजूंनी जात – येत आहेत. अवजड वाहनांची वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद आहे. चालकांना फक्त दिवसा गाड्या चालवा असेही निर्देश देण्यात आले आहेत. रामबन आणि बनिहाल येथे जमीन खचल्यामुळे महामर्गाचे तसेच आसपासच्या भागांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. चालकांना रस्त्यात अनावश्यक थांबे घेणे टाळा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मुघल रोड, सिंथन रोड आणि एसएसजी रोड बर्फ साचल्यामुळे बंद आहेत.

नागरिकांना महत्त्वाचे काम नसल्यास घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. अनेक ठिकाणी सोमवार २१ एप्रिल रोजी पुन्हा पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आठवड्याभरासाठी शेतीची कामं टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नद्यांच्या पाण्याच्या पातळीत एकदम वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -