Monday, April 21, 2025
Homeदेशघरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या झाली. ही हत्या त्यांच्या पत्नीने केल्याचे प्राथमिक पोलीस तपासातून उघड झाले आहे. सध्या माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पत्नी आणि मुलगी या दोघी तुरुंगात आहेत. दोघींची पोलीस चौकशी सुरू आहे.

Female Police Officer Ashwini Bidre : कधी काळी राष्ट्रपतींकडून कौतुक करुन घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप, महिला सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी शिक्षा

माजी डीजीपी ओम प्रकाश यांची चाकूने वारंवार वार करुन हत्या करण्यात आली. याआधी त्यांचे हातपाय बांधण्यात आले तसेच त्यांच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकण्यात आल्याचेही प्राथमिक तपासातून लक्षात आले आहे. मिरचीची पूड डोळ्यांत गेल्यामुळे ओम प्रकाश यांच्या डोळ्यांची आग होऊ लागली, ते एकदम अस्वस्थ झाले. ही संधी साधून ओम प्रकाश यांचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर चाकूने वारंवार वार करुन माजी डीजीपी ओम प्रकाश यांना गंभीर जखमी करण्यात आले. अती रक्तस्रावामुळे ओम प्रकाश यांचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर थोड्या वेळाने खात्री करुन घेण्यात आली. नंतर हातपाय सोडण्यात आले. यानंतर काही तास वेळ वाया घालवून अखेर ओम प्रकाश यांची पत्नी पोलीस ठाण्यात गेली. तिनं पोलिसांना पती मृतावस्थेच आढळल्याचे सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

माजी पोलीस महासंचालकांच्या शरीरावर चाकूचे वार बघून पोलीस पथक चपापले. त्यांना हत्येचा संशय आला. यामुळे पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. तसेच ओम प्रकाश यांच्या घरातील सर्वांची कसून चौकशी करण्याचा निर्णय घेतला. अखेर ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी यांनी घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मागील काही दिवसांपासून घरात वाद सुरू होता. घटना घडली त्या दिवशीही सकाळी वाद सुरू होता. वाद वाढू लागला आणि ओम प्रकाश यांनी त्यांच्याकडे असलेल्या खासगी शस्त्राचा धाक दाखवण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात ओम प्रकाश गोळी झाडतील या भीतीपोटी त्यांच्या डोळ्यांवर मिरचीची पूड फेकली. मिरचीची पूड डोळ्यांत गेल्यामुळे ओम प्रकाश अस्वस्थ झाले आणि तिथेच जमिनीवर कोसळले. ते जमिनीवर पडताच त्यांचे हातपाय बांधण्यात आले. यानंतर स्वसंरक्षणासाठी चाकूने ओम प्रकाश यांच्या शरीरावर वार केल्याचे पल्लवी यांनी सांगितले… पण स्वसंरक्षणासाठी एक – दोन वार केले जातील. प्रत्यक्षात ओम प्रकाश यांच्या शरीरावर वारंवार चाकूने वार केल्याच्या खूणा आढळल्या. यामुळे पोलिसांनी पल्लवी यांची कसून चौकशी सुरू केली. अखेर पल्लवी यांनी हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक केली. तसेच मुलीला ताब्यात घेतले. ओम प्रकाश यांच्या मुलीने नेमके काय केले हे जाणून घेण्यासाठी पोलीस तिची चौकशी करत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -