ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. ज्यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळते. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण कलिंगडमध्ये सुमारे ९०% पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. कलिंगड खाण्यासाठी देखील चवदार असते. कलिंगडमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया कलिंगड खाण्याचे असंख्य फायदे..
कलिंगड जास्त प्रमाणात खाऊ नये. न्याहारी आणि दुपारच्या जेवणाच्या दरम्यान हे टाळले पाहिजे. संध्याकाळी तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. मध्य रात्री ते खाणे टाळा, अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते.
कलिंगडमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. कलिंगडमध्ये आढळणारे व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनची पातळी त्वचा निरोगी ठेवते आणि केसांच्या वाढीस मदत करते. शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असल्यास कलिंगड त्यापासून आराम देते.
काही लोकांचा समज असतो की कलिंगड गोड असल्यामुळे त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते पण तसे नाही. संशोधनात असे दिसून आले आहे की १०० ग्रॅम कच्च्या कलिंगडमध्ये फक्त ६.२ ग्रॅम साखर असते. कमी कॅलरीजमुळे वजन वाढत नाही.
कलिंगड हे अनेक पोषक तत्वांनी युक्त फळ आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. कलिंगडमध्ये लायकोपीन असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.
कलिंगडमध्ये अमिनो अॅसिड सिट्रुलीन आणि नायट्रिक ऑक्साइड आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
कलिंगडात असणाऱ्या लायकोपीनमुळे दृष्टी सुधारते. लाइकोपीनमधील अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म कमी दृष्टीची समस्या दूर करतात आणि दृष्टी सुधारतात.
कलिंगडाचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. कलिंगड खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, त्याचा रस अॅनिमियाच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरतो.
कलिंगड खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले फायबर आतडे निरोगी ठेवते. कलिंगडमध्ये असलेले व्हिटॅमिन ए रोगप्रतिकारक शक्तीला संसर्गापासून वाचवते.

कलिंगडाच्या सेवनाने इम्यूनिटी मजबूत राहते. यातील व्हिटामीन सी इम्यून सिस्टिम मजबूत ठेवतो. यातील फायबर्स आतड्यांनाही निरोगी ठेवतात. कलिंगडात व्हिटामीन असते ज्यामुळे इम्यून सिस्टिम चांगली राहते आणि इन्फेक्शनचा धोका टळतो. फक्त कलिंगडच नाही तर कलिंगडाच्या बियासुद्धा फायदेशीर ठरतात.