Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीShivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण जखमी झाले असून पाच बालकांचा यात समावेश आहे. या आधीही शिवनेरीवर चार वेळा अशाप्रकारचा हल्ला मधमाशांनी पर्यटकांवर केला होता.

Female Police Officer Ashwini Bidre : कधी काळी राष्ट्रपतींकडून कौतुक करुन घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जन्मठेप, महिला सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी शिक्षा

पुण्यातील शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सर्वदूर पसरलेला आहे. शिवनेरी किल्ल्यावर सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी येतात. शुक्रवार, शनिवार, रविवार या जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी शिवनेरी किल्ल्यावर पर्यटन करण्यास पसंती दर्शवली. रविवारी पर्यटकांची तुलनेने जास्त गर्दी होती. या गर्दीत मोठ्यांसह लहानांचा देखील समावेश होता. रविवारी सकाळच्या सुमारास पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांवर झाडावर असलेल्या मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात १६ पर्यटक गंभीर जखमी झाले. या मध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश आहे. सकाळी मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटनेनंतर काही काळ शिवभक्तांना किल्ल्यावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला होता. सकाळी झालेल्या घटनेची व्याप्ती पाहता, पुन्हा लगेच कोणावर हल्ला होऊ नये, यासाठी किल्ला दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले. या आधीही चार वेळा मधमाशांनी पर्यटकांवर अशाप्रकारचा हल्ला केला होता. या हल्ल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान जखमींना जुन्नरच्या छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मधमाशांना त्रास न देताही मधमाशा हल्ला का करतात. ?

चहू बाजूंनी झाडांची दाटी असलेल्या आणि शांतता असलेल्या ठिकाणी कुठे ना कुठे मधमाशा वावरत असतात. फुलांच्या आतील रस शोषून आपल्या घरट्याची बांधणी करतात. मधमाशांना जर त्रास दिला तर त्या चवताळतात आणि आजूबाजूला असलेल्या माणसांना दंश करतात. त्यांच्या दंशाने शरीराला इजा होऊ शकते. जंगल, गडकिल्ले अशा ठिकाणी मधमाशांचा वावर जास्त प्रमाणात असतो. म्हणून गडकिल्ल्यांवर जाताना परफ्यूम, अत्तर सारखे सुगंधीत द्रव्ये अंगाला लावणे टाळा. परफ्यूम, अत्तरच्या सुवासाने मधमाशा आकर्षित होऊन दंश करतात. तसेच गडकिल्ल्यांसारख्या शांत ठिकाणी आरडाओरडा करणे टाळा, शेकोटी सदृश्य कोणतीही जाळपोळ करू नका, सिगरेट सारखे धूम्रपान टाळा. आगीच्या धुराने मधमाशा चवताळतात त्या सैरावैरा होऊन हल्ला करतात. अशा वेळी घाबरून न जाता गडकिल्ल्यांवर जाताना सोबत एक चादर जवळ ठेवा, त्याचबरोबरीने प्रथमोपचाराचे साहित्य देखील जवळ बाळगा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -