महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट घालायला आवडते. सध्या मार्केटमध्ये अँकलेटसच्या फार डिझाईन्स पाहायला मिळतात. तुम्हालासुद्धा अँकलेटस घालायला आवडत असतील तर आम्ही तुमच्यासाठी चांदीच्या अँकलेटचे असे डिझाइन घेऊन आलो आहोत जे पाहून तुम्ही सुद्धा खरेदी करू शकता.
पायांचे सौंदर्य
विवाहित महिला आणि नववधूंच्या पायांवर पायाची फुले खूप छान दिसतात. यामध्ये, पायाची अंगठी अँकलेटसह जोडलेली असते.त्यामुळे लग्नासाठी पैंजण म्हणून ही अतिशय सुंदर डिझाईन आहे.
फोटो सौजन्य : mitalipayalsagra
सुंदर अँकलेट डिझाइन
अँकलेटमध्ये या प्रकारची डिझाइन पसंत केली जाते. हे पैंजण एकदम साधं आहे, पण यांची बांधण्याची पद्धत वेगळी आहे. फोटो सौजन्य : marwari_silver_store
स्टायलिश अँकलेट डिझाइन
जर तुम्हाला खूप रंगीबेरंगी अँकलेट डिझाइन आवडत नसतील तर तुम्हाला हे डिझाइन नक्कीच आवडेल.अतिशय सुंदर आणि भरगच्च दिसणारं पैंजण तुमच्या पायांचे सौंदर्य नक्कीच वाढवेल. फोटो सौजन्य : marwari_silver_store
सोबर अँकलेट
आधुनिक अँकलेट डिझाइन पायामध्ये खूप छान दिसतात. जर तुम्ही कुर्ती परिधान केली असेल तर तुम्ही या प्रकारच्या डिझाइनचा वापर करू नक्की शकता.। फोटो सौजन्य : kabras_silverplaza
चैन डिझाईन
या अँकलेटची ही डिझाईन एकदम सोबर दिसते. एक साखळी आणि त्याच्यावर केलेलं फुलांचं काम हे पायात बघण्यासाठी खूप सुंदर दिसतं. फोटो सौजन्य : hub_jewellery_darbar
भरगच्च घुंगरू पैंजण
जर तुम्हाला पैंजणांच्या घुंगरांचा आवाज फार आवडत असेल तर तुम्हाला या प्रकारचे पैंजण नक्कीच आवडतील. तुम्ही त्यात अनेक घुंगरू घालू शकता.। फोटो सौजन्य : marwari_silver_store
नाणे अँकलेट डिझाइन
आता ही डिझाईन नेकलेस म्हणा किंवा गळ्यातल्या चोकरमध्ये पाहायला मिळतेच. मात्र आता अँकलेटमध्ये ही साजेशी डिझाइन खूप ट्रेंडमध्ये आहे. या प्रकारच्या पॅटर्नचे अँकलेट एथनिक आउटफिट्ससोबत सुंदर दिसतात. फोटो सौजन्य : shivamjwellerssj
बाजुबंद डिझाईन पैंजण
बाजुबंदासारखी डिझाईन आता पैंजणमध्ये सुद्धा पाहायला मिळते. तीन चार चैनची एक साखळी बनवून त्याच्यामध्ये रंगीबेरंगी डीझाईन तयार करून हे अँकलेट बनवलेलं असतं. कोणत्याही समारंभाराला तुम्ही हे पैंजण हमखास घालू शकता. फोटो सौजन्य : marwari_silver_store