Sunday, April 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजप्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर

कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र, घराचे करार करण्यासाठी, मालमत्तेचा करार करण्यासाठी, मृत्युपत्र बनवण्यासाठी अनेक कारणासाठी या स्टॅम्प पेपरची गरज भासते आणि ज्या कारणासाठी तो लागतो ते कारण बनवल्यानंतर म्हणजेच प्रतिज्ञापत्र बनवल्यानंतर आपल्याला रजिस्टर नोटरी केली जाते. ज्यावेळी या सर्व कायदेशीर गोष्टी केल्या जातात. त्यावेळी जी लोक बनवतात त्यांच्या सह्या त्याचप्रमाणे साक्षीदारांच्या या सह्या केल्या जातात. तेव्हाच तो पेपर कायदेशीर म्हणून ओळखला जातो. जगन्नाथ हा सरकारी कर्मचारी होता आणि त्याची अनेक लोकांशी ओळख होती. असाच एक जण त्याच्याकडे आला. त्याला दुकानासाठी लायसन करून पाहिजे आहे. त्यावेळी जगन्नाथ यांनी एका मित्राची ओळख आहे त्याची ओळख घालून देतो असे सांगितलं. त्याप्रमाणे जगन्नाथ यांनी कुरेशी भाईची ओळख आपल्या मित्राशी करून दिली. त्या मित्राचे नाव रमेश असे होते. त्याने कुरेशी यांची ओळख त्यांचे आधार कार्ड वगैरे बनवणाऱ्या एजन्सी अाहेत. ज्या ठिकाणी सर्व सरकारी कामे केली जातात. आपले सरकार या ठिकाणी असलेल्या राजन नावाच्या माणसाची ओळख करून दिली की, हा माणूस तुम्हाला तुमचं काम करून देईल. राजन यांनी कुरेशी यांना ठराविक रक्कम सांगितली ती कुरेशी द्यायला तयार झाले. अर्धी रक्कम देण्याचे ठरवलं त्यावेळी कुरेशीने राजन यांना २५ लाख रुपये दिले आणि त्यावेळी अॅग्रीमेंट बनलं.

प्रतिज्ञापत्र बनवण्यात आलं की कुरेशी याने राजन यांना २५ लाख दिलेले आहेत. अमुक अमुक दिनांक आणि ते कोणत्या कामासाठी दिलेले आहेत. जर काम झालं नाही तर ते पैसे परत राजन कुरेशी यांना करणार. त्याच्यात असेही नमूद केलेलं होतं की दोन्ही पार्टी जर यात नसतील, तर त्यांच्या वारसांनी हा व्यवहार पूर्ण करावा. त्यासाठी त्याच्यावर साक्षीदार म्हणून ओळख करून देणाऱ्या जगन्नाथची व रमेश यांनी साक्षीदार म्हणून सही केली. कारण कुरेशी हा जगन्नाथ यांना ओळखत होता. जगन्नाथच्या मार्फत रमेशची ओळख झालेली होती आणि रमेशने राजन यांची ओळख करून दिलेली होती. व्यवहार हा कुरेशी आणि राजन याच्यात झालेला होता. पण जगन्नाथ आणि रमेश हे दोघांना ओळखत असल्यामुळे ते साक्षीदार झाले होते. दोन वर्षे होऊन गेले तरीही राजन काही काम करत नव्हता म्हणून कुरेशी याने त्याच्यामागे पैसे देण्याचा तगादा लावला. राजनने कुरेशींचेच नाहीत, तर अनेक जणांकडून पैसे घेतलेले होते. ते सर्वजण त्याला दम देऊ लागले होते. राजन याने कुरेशी यांना येण्याची १२ तारीख दिली की तुम्ही त्या दिवशी या आणि मी तुम्हाला त्या दिवशी पैसे देतो. कुरेशी आणि त्याच्याबरोबर दोन साथीदार राजनच्या असलेल्या शॉपमध्ये गेले. शॉपच्या बाहेर बघतात, तर पाटी लावलेली होती की राजन यांना श्रद्धांजली. कुरेशी यांनी आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा समजलं की, राजनने आत्महत्या कालच केलेली आहे. हे ऐकून कुरेशींना धक्काच बसला आणि ते त्यांच्या कुटुंबाला भेटून तिथून निघाले.

दोन दिवसांनी कुरेशींना पोलीस स्टेशनवरून फोन आला. ते तिथे गेले असता त्यांना असं समजलं की राजन याच्या पत्नीने कुरेशी, रमेश आणि जगन्नाथ यांच्यावर तक्रार दाखल केलेली आहे. तीन-चार जणांची नावे होती जे तीन-चार जण होते ते मेन आरोपी होते. कारण त्याने राजनला धमकी देऊन मारझोड केलेली होती. कुरेशीने फक्त पैशांची मागणी केलेली होती म्हणून त्याच्यात त्यांची नावे होती की कुरेशीने दिलेले २५ लाख रुपये. सरकारी अधिकारी जो काम करणार होता त्याला १५ दिले आणि रमेश आणि जगन्नाथ यांना पाच पाच लाख रुपये दिले. म्हणजे राजनच्या पत्नीने असं दाखवलं की जे पैसे मिळाले ते आम्ही साक्षीदार जे होते त्यांनाच दिले. दहा लाख रुपये आणि पंधरा लाख सरकारी अधिकाऱ्याला दिले. आम्ही त्यातले काहीच घेतले नाही. साक्षीदार असलेले जगन्नाथ आणि रमेशने फक्त त्या प्रतिज्ञापत्रावर सही घेतली होती पण पैसे काही घेतले नव्हते. ते फक्त त्या प्रतिज्ञापत्रासाठी साक्षीदार होते आणि कुरेशीची ओळख रमेशशी जगन्नाथ यांनी करून दिली होती. रमेशने कुरेशीची ओळख राजनशी करून दिली होती. ओळख करून दिल्यामुळे ते साक्षीदार झाले होते. आज राजनने आत्महत्या केल्यामुळे ते आता साक्षीदारचे आरोपी झालेले होते.

राजनच्या पत्नीने आरोप केला होता की, या लोकांच्या त्रासाला कंटाळून माझ्या पतीने आत्महत्या केली. आज जगन्नाथ आणि रमेश हे व्यवहारातील साक्षीदार होते पण आज तेच कुठेतरी फसले होते आणि आरोपी झालेले होते. राजनने अनेक लोकांचे पैसे थकवले होते. अनेक लोकांकडून त्यांनी पैसे उचललेले होते आणि ते देता येत नव्हते म्हणून त्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला होता. पण जे साक्षीदार होते ते मात्र आता या सगळ्या गोष्टींमध्ये बसलेले होते. अटक होऊ नये म्हणून या सर्वांनीच अटकपूर्व जामीन घेतलेला होता पण कोर्टाचा फेरा मात्र त्यांना आता चुकलेला नव्हता. (सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -