गुरुनाथ तेंडुलकर
या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची असली, तर कुदळ, फावडं, खोरं, घमेलं, झारी, कात्री, दोरी वगैरे जे सामान आवश्यक असतं त्याला आपण बागकामाचं साहित्य म्हणतो. घरबांधणीसाठी दगड, विटा, चुना, रेती, सिमेंट, लोखंडी सळ्या आणि लाकडे वगैरे जे सामान आवश्यक असतं त्याला आपण बांधकामाचं साहित्य असं म्हणतो. पण तरीदेखील केवळ साहित्य असा शब्द उच्चारला म्हणजे आपल्याला जाणीव होते ती वाङ्मयातील साहित्याची. पेन, पेन्सिल, कागद, शाई हे साहित्य निर्माण करण्यासाठी लागणारं सामान झालं, पण साहित्यिक भाषेत ज्याला ‘साहित्य’ म्हणतात ते साहित्य म्हणजे नेमकं काय? या साहित्याची व्याख्या करणं जरा अवघडच आहे. कारण साहित्य म्हणजे काही एक, दोन, तीन असं मोजून दाखवता येणारं सामान नव्हे. कथा, कादंबरी, कविता, नाटक हे साहित्याचे प्रकार झाले. पण या साऱ्यातून जे व्यक्त होतं ते साहित्य. साहित्य या शब्दाची व्याख्या करताना एक थोर तत्त्वचिंतक म्हणतो, त्या पालकांना हे देखील कळत होतं की, या मार्कांच्या मागे धावण्याच्या नादात मुलांचं मूलपणच हरवत चाललंय. ‘या जीवघेण्या स्पर्धांनी जीव नकोसा झालाय,’ असा सूर बहुसंख्य पालकांच्या बोलण्यातून आढळला. तरीसुद्धा या स्पर्धेच्या युगात आपलं मूल कुठंही मागं पडू नये, म्हणून प्रत्येक पालकाची धडपड होती. त्या सामाजिक संस्थेनं शेवटी या गैरहजेरीच्या मुळाशी, सध्याची जगातली ही स्पर्धा असल्याचे निष्कर्ष काढले होते. खरंच, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा या शब्दाला इंग्रजीत प्रतिशब्द ‘कॉम्पिटिशन’ असा आहे. ‘कॉम्पिट’ म्हणजे एकमेकांशी झुंजणे, चढाओढ. इतरांपेक्षा मी अधिक श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याची धडपड, अहमहमिका. माणसाच्या आयुष्यात ही स्पर्धा नेमकी केव्हा आणि कशी सुरू झाली हे नेमकं सांगणं कठीण आहे तरीसुद्धा एक मानसशास्त्रीय अंदाज या संदर्भात मांडला जातो.
माणसाला अगदी सुरुवातीला, त्याच्या अगदी आदीम अवस्थेत असताना, सभोवालच्या जंगलातील जनावरांपासून भय होतं. रानातील इतर जंगली श्वापदांच्या तुलनेनं माणूस तसा दुबळाच. तेव्हा त्या पशुंशी स्पर्धा करून जिंकण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. त्या स्पर्धेत हार म्हणजे केवळ मृत्यू. जगण्यासाठी आवश्यक अशा या स्पर्धेत केवळ भाग घेऊन चालण्यासारखं नव्हतं, तर जिंकणंही तितकंच आवश्यक होतं. माणूस जीवाची बाजी लावून या स्पर्धेत उतरला आणि जिंकला. शारीरिक बळावर नव्हे, तर केवळ बुद्धीच्या जोरावर. निसर्गातल्या इतर प्राण्यांबरोबरची ही स्पर्धा माणसानं जिंकली आणि त्यानंतर माणूस हा केवळ सामान्य प्राणी राहिला नाही. माणूस सृष्टीचा राजा ठरला. कधी निसर्गाशीसुद्धा दोन हात करून, तर कधी निसर्गाच्या हातात हात घालून माणूस सृष्टीतल्या सर्व प्राण्यांबरोबरची स्पर्धा जिंकत गेला. ‘माणूस’ नावाच्या प्राण्याबरोबर स्पर्धा करू शकेल असा एकही प्राणी उरला नाही. मग ही स्पर्धा माणसामाणसांत सुरू झाली. निसर्गातील इतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे आहोत, याची तर त्याला जाणीव झालीच होती, पण आपल्यासारख्याच इतर माणसांहूनही मी भिन्न आहे, याचीही त्याला जाणीव झाली आणि हे वेगळेपण जपायचं, त्याचा नीट उपयोग करून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं, या भावनेतून स्पर्धा सुरू झाली. ही माणसामाणसांतील स्पर्धा सुरू झाली मात्र आणि नंतर माणसाच्या जीवनाला एक वेगळीच गती प्राप्त झाली. इतरांपेक्षा मी वेगळा आहे, श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी भव्य-दिव्य करायला हवं या ऊर्मीपोटीच तर माणूस आजवरचे प्रगतीचे नवनवे टप्पे गाठू शकला. यशाचे नवनवे उच्चांक गाठताना पूर्वीच्या उच्चांकांशी स्पर्धा करणं हे तर क्रमप्राप्तच होतंच.
आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला आणि क्रीडासारख्या सर्व क्षेत्रात जे नेत्रदीपक यश पाहतोय याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही स्पर्धेची वृत्ती. इतरांपेक्षा मी जलद पोहोचेन, या ऊर्मीतूनच निरनिराळ्या वाहनांचा शोध लागत गेला. इतरांपेक्षा आपली उत्पादनक्षमता वाढावी, या भावनेतूनच अनेक यंत्रं निर्माण झाली. इथंवर सारं काही व्यवस्थित होतं, पण पुढे या निकोप स्पर्धेत ईर्षा घुसली आणि तिथून माणसाच्या अधःपतनाला आरंभ झाला. मी मोठा हे सिद्ध करायचं असेल, तर दुसऱ्याला लहान ठरवायला हवं, अशी वृत्ती निर्माण झाली. दुसऱ्याच्या यशामुळे आनंद होण्याऐवजी दुःख व्हायला
लागलं. असूयेतून माणूस आतल्या आत जळू लागला. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गाशी दोन हात करणारा, स्वतःच्याच जातभाईंशी लढू लागला. लढाई जिंकण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब करू लागला. येनकेन प्रकरणे जिंकायचं आणि पुढं जायचं यासाठी भलेबुरे मार्ग शोधले जाऊ लागले. दुसऱ्याच्या पुढे जाण्यासाठी स्वतःचा वेग वाढवणं यात काहीच वावगं नव्हतं, पण स्वतःचा वेग वाढवण्यापेक्षा, दुसऱ्याचे पाय मागे ओढून त्याला मागे पाडणं अधिक सोपं आहे, हे जाणवल्यानंतर नीती-अनीतीचा विचार न करता यशासाठी शॉर्टकट शोधले जाऊ लागले.
परीक्षेतील यशासाठी शिक्षकांना हाताशी धरून केलेली पेपरफुटी असो किंवा लोकशाही मार्गानं सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या निवडणुकांतील मतपत्रिका किंवा क्वचित उमेदवारालाही पळवून नेण्याचे प्रकार असो. उद्देश एकच. स्पर्धा जिंकायची. खेळासारख्या मनोरंजनाच्या प्रकारातही मग ही व्यावसायिक वृत्ती घुसली. ‘मॅच फिक्सिंग’सारखी प्रकरणं सुरू झाली. खेळात भ्रष्टाचार घुसला. खेळाचा खेळखंडोबा झाला. मोठ्या माणसांचं सोडा, पण अगदी तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूससुद्धा या चक्रात कधी ओढला गेला हे कळलंच नाही. याचीच परिणती मग ‘तुझ्याजवळ आहे ते माझ्याजवळ असलंच पाहिजे’ किंबहुना ‘माझ्याजवळ नाही, तर ते तुलादेखील मिळता कामा नये’ ही वृत्ती निर्माण झाली.
प्रेमासारख्या उदात्त भावनांतही ही स्पर्धा शिरली आणि परिणामी जी सीता मला मिळाली नाही ती रामाला मिळता कामा नये अशी रावणी वृत्ती निर्माण झाली. रावणानं सीतेचं अपहरण केलं, पण निदान तिला सुरक्षित, सुखरूप तरी ठेवलं; पण हल्ली रिंकू पाटील, अमृता देशपांडे, नीता हेंद्रे, विद्या प्रभुदेसाई … प्रेमात हे असले प्रकार आणि युद्धात ? युद्धात तर सगळंच क्षम्य. म्हणूनच की काय शत्रूचा पुरता निःपात करण्यासाठी अणुबाँब आणि रासायनिक अस्त्रांचे शोध लावण्यास शास्त्रज्ञ प्रवृत्त झाले. स्पर्धा खऱ्या अर्थाने ‘जीवघेणी’ ठरू लागली आणि या जीवघेण्या स्पर्धांचं उदात्तीकरण करण्यासाठी मग अशा युद्धांना कधी धर्मयुद्ध असं नाव दिलं तर कधी साम्राज्यविस्तार. आज केवळ मानवजातीला नव्हे, तर पृथ्वीवरची संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात आणणारी ही शस्त्रस्पर्धा, अण्वस्त्रस्पर्धा. या स्पर्धा अशाच चालू राहिल्या, तर जगाचा विनाश हा ठरलेलाच. पण या स्पर्धांतील असूया नि मत्सर जर आपण प्रयत्नपूर्वक टाळले, तर या स्पर्धांतून विनाशाऐवजी विकास साधला जाईल, तुमचा, आमचा सर्वांचाच आणि नंतरच माणूस खऱ्या अर्थाने महामानव बनू शकेल.