Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक

ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न आ वासून उभा आहे. पालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची मादी पालिका प्रशासन जाहीर करते. त्यानुसार पालिका क्षेत्रात ९६ इमारती अतिधोकादायक असून, चार हजार ४०७ इमारती या धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षपिक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

पावसाळ्यात धोकादायक व अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, बासाठी ठाणे पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. पालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीचे सी-१, सी-२ ए, सी-२ बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तत्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतीची किरकोळ दुरुस्ती करणे असे वर्गीकरण केले आहे. ठाणे महापालिकेने शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरात ९६ इमारती या अतिधोकादायक यादीत येत असून, त्या इमारती खाली करून पाडण्याची कारवाई पालिकेने सुरू केली आहे. त्यातील २५ इमारती या आजघडीला व्याप्त आहेत.

तसेच १५ इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली असून, १० इमारतींचे धोकादायक बांधकाम काढलेले आहे. आता ज्या इमारती अतिधोकादायक असूनही रिकाम्या केलेल्या नाहीत अशा इमारतधारकांना पालिकेने नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. येथील इमारतधारकांनी पर्यायी व्यवस्था पाहावी, असे आवाहनही पालिकेने केले आहे. धोकादायक इमारतींमध्ये चार हजार ४०७इमारतीचा समावेश आहे. मागील वषपिक्षा यंदा अतिधोकादायक इमारतींची संख्या ही १० ने तर धोकादायक इमारतींची संख्या ही ११० ने वाढली आहे.

Comments
Add Comment