मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे सर्वच फलंदाज हाणामारीमध्ये बाद झाले. आजच्या सामन्यात पुन्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
दोन्ही संघाची फलंदाजी व गोलंदाजी उत्तमच आहे.संघ तेच आहेत फक्त ठिकाण वेगळे आहे. आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नक्कीच कम बॅक करेल अशी आशा आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ या हंगामात चांगल्या लयीत दिसत असून त्यांनी नेहमीच सहजा सहजी हार मानलेली नाही.
आक्रमक खेळ करून समोरच्या संघावर दबाव टाकण्याची त्यांची क्षमता आहे. परंतु पंजाबला हलक्यात घेण्याची चुकी बेंगळुरूने करू नये कारण या हंगामात हा संघ सात पैकी फक्त दोन सामने गमावून गुण तक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात त्यांनी बाजी मारलेली आहे. पंजाबसाठी अजून एक चांगली बातमी म्हणजे युजवेंद्र चहलला सुर गवसलेला आहे.
चला तर जाणून घेऊयात पंजाबची गोलंदाजाची ब्रिगेड पुन्हा एकदा बेंगळुरूवर भारी पडणार का?