मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ९ विकेटनी मात केली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. चेन्नईने शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ५ विकेट गमावत १७६ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईने रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर १६ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले आणि ९ विकेटनी सामना जिंकला.
१७७ धावांच्या प्रत्युत्तरात उतरलेल्या मुंबईने सुरूवात शानदार केली. रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन कमालीच्या लयीमध्ये दिसली. दोघांमध्ये ६३ धावांची भागीदारी झाली. ७व्या षटकांत रिकल्टनला जडेजाने बाद केले. यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यांच्यात तुफानी भागीदारी झाली. दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने ४५ बॉलमध्ये नाबाद ७६ धावांची खेळी केली. यात ६ चौकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. तर सूर्याने ३० बॉलमध्ये ६८ धावांची तुफानी खेळी केली.
पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरलेल्या चेन्नईची सुरूवात चांगली नाही. रचिन रवींद्र आणि शेख रशीदने संथ सुरूवात केली. चौथ्या षटकांत रचिन रवींद्रने आपली विकेट गमावली. यानंतर १७ वर्षाच्या आयुष म्हात्रेने कमालीची फलंदाजी केली. म्हात्रेने ३२ धावा केल्या.