प्रसिद्ध डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी महिलेला पोलीस कोठडी
April 20, 2025 04:44 PM 155
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी १८ एप्रिल रोजी आत्महत्या केली. डोक्यात गोळी घालून घेत त्यांनी आयुष्य संपवलं. या प्रकरणात सदर बाजार पोलिसांनी वळसंगकर रुग्णालयात काम करणाऱ्या मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने नावाच्या महिलेला अटक केली होती. या महिलेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी हा निर्णय दिला.
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा ...
कामावरुन काढून टाकल्यानंतर मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने नावाच्या महिलेने डॉ. शिरीष वळसंगकर यांना पत्र पाठवले होते. या पत्रात कामावर परत घेतले नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकी दिली होती. हे पत्र मिळाल्यानंतर डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी घरी येऊन रात्री साडेआठ वाजता स्वतःचे परवाना असलेले शस्त्र हाती घेतले आणि डोक्यात गोळी घालून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी डॉक्टरांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत मनीषामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख होता. ही चिठ्ठी बिघतल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आणि मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने नावाच्या महिलेला अटक केली. यानंतर महिलेविरोधात पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएलचा सामना बघण्यासाठी आलेल्या ...
नेमके काय घडले ?
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर १८ एप्रिल रोजी रात्री घरी आले. ते हात धुण्याच्या निमित्ताने बेडरूमच्या बाथरूममध्ये गेले. तिथेच त्यांनी डोक्यात गोळी घालून घेत आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील सर्वांनी डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या बेडरूमच्या दिशेने धाव घेतली. बाथरूमच्या जमिनीवर डॉक्टर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे बघून घरातल्या सर्वांनाच धक्का बसला. डॉक्टरांना तातडीने वळसंगकर रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली आणि न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये आले. यानंतर लगेच तपासाला सुरुवात झाली.
डॉ. अश्विन वळसंगकर यांनी केली तक्रार
डॉ. अश्विन शिरीष वळसंगकर यांनी प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी मनीषा महेश मुसळे उर्फ मनीषा माने नावाच्या महिलेबाबत संशय व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी तपास केला आणि तातडीने कारवाई केली.