बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई शहरात कामानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. मात्र आता मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक एक कायमस्वरूपी बंद होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांची फरफट होणार आहे.
Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता. मात्र प्रवाशांनी त्याला कडाडून विरोध केल्यानंतर रेल्वेकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडून हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मेगाब्लॉक घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर बॅरिकेटिंग केलं जाणार आहे. याची प्रवाशांमध्ये कुठेही वाच्यता होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गोपनीयता पाळण्यात येत आहे.
सध्या अस्तित्वात असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक हा कायमस्वरूपी रेलिंग लावून बंद करण्यात येणार असल्याने बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या प्रवाशांना मोठी फरफट होणार आहे. इतकच नाही तर पूर्वेकडील प्रवाशांना पश्चिमेकडे जाऊन मग प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून म्हणजे सध्याच्या होम प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडावी लागणार आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयानंतर बदलापूरकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.