Monday, May 12, 2025

महामुंबईमजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे 'हे' पदार्थ टाळा

Summer Food Alert : उन्हाळ्यात शरीराची उष्णता वाढवणारे 'हे' पदार्थ टाळा

मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करत आहे. मात्र शरीरातील उष्णतेची काळजी घेण्यासाठी आहारात काही पदार्थांचा शक्यतो समावेश करू नये. या आहारामुळे डिहायड्रेशन, उष्णतेचा ताण यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. खरंतर, उन्हाळ्यात भूक आणि तहान जास्त लागते. उष्णता, कडक उन्हामुळे आणि आर्द्रतेमुळे भूक कमी होते आणि त्यामुळे खाण्याची आणि पिण्याची इच्छा देखील कमी होते. अशात पालेभाज्या, फळे खाणे योग्य राहील. तसेच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने चक्कर येणे, थकवा जाणवणे या प्रकारचा त्रास होत नाही.



पुढील पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात :-


मसालेदार
मसालेदार पदार्थांमुळे शरीरातील उष्णता वाढते. यामुळे पोटात जळजळ, आम्लपित्त आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात . उन्हाळ्यात फक्त हलके मसालेदार पदार्थच खावेत, कारण मिरची, लवंग, दालचिनी, जिरे, वेलची यांसारखे मसाले शरीराची उष्णता वाढवू शकतात.


तळलेले अन्न
उन्हाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्याने शरीराचे तापमान वाढते. याशिवाय, तळलेल्या अन्नातही कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.


फास्ट फूड
आजकाल लोकांना बाहेरचे जेवण खूप आवडते, ज्यामध्ये फास्ट फूड जास्त खाणे पसंत केले जाते. पण, फास्ट फूडमध्ये पीठ, तेल आणि मसाले जास्त प्रमाणात असतात. या गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहेत आणि उन्हाळ्यात त्या टाळल्या पाहिजेत.


चहा आणि कॉफी
उन्हाळ्यात जास्त चहा आणि कॉफीचे सेवन करू नये, कारण चहा आणि कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफिन शरीराला डिहायड्रेट करते आणि शरीराचे तापमान वाढवते.


मांसाहारी
उन्हाळ्यात मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे, कारण मांसाहारी पदार्थ पचायला वेळ लागतो. यामुळे शरीरात उष्णता वाढते, ज्यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो.

Comments
Add Comment