मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएलचा सामना बघण्यासाठी आलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू असताना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला गेला. ही घटना वानखेडे स्टेडियममध्येच घडली.
Thackeray : उद्धव – राज ठाकरेंचा जुना खेळ नव्यानं सुरू, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा
मुख्य न्यायदंडाधिकारी सहकुटुंब क्रिकेट सामना बघण्यासाठी आले होते. सर्वजण खेळाचा आनंद लुटत होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर
आयपीएलमध्ये बेटिंग, एकाला अटक
आयपीएलमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तज्ज्ञ मोबाईलची तपासणी करत आहेत आणि पोलीस अटकेतील व्यक्तीची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा ११ ने ही कारवाई केली आहे. माणिकचंद कृपाशंकर मौर्या असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग खेळत होता.