काही दिवसांपूर्वी २६/११ चा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण झालं. त्यानंतर आर्थिक फसवणुकीचा आरोपी मेहुल चोकसी यालाही बेल्जियममध्ये अटक झाली. त्याचंही प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. पण, प्रत्यार्पण म्हणजे नेमकं काय, आणि भारताचे किती देशांबरोबर प्रत्यार्पण करार आहेत, त्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत.
प्रत्यार्पण म्हणजे?
प्रत्यार्पण म्हणजे, एका देशाने दुसऱ्या देशाकडे गुन्हेगाराला खटल्यासाठी किंवा शिक्षेसाठी पाठवण्याची प्रक्रिया किंवा विनंती करणं. दुसऱ्या शब्दांत, गुन्हा करून दुसऱ्या देशात पळून गेलेल्या व्यक्तीला, गुन्ह्याचा आरोप करणाऱ्या देशाकडे परत पाठवणं म्हणजे प्रत्यार्पण. प्रत्यार्पणाची प्रक्रिया विविध देशांच्या कायद्यांवर अवलंबून असते. विनंती करणारा देश प्रत्यार्पणासाठी विनंती करतो. विनंती स्वीकारलेला देश या विनंतीचा विचार करून ती स्वीकारायची की नाकारायची, हे ठरवतो. विनंती स्वीकारल्यास, विनंती केलेल्या देशाने आरोपीला विनंती करणाऱ्या देशाकडे सुपूर्द करायला हवा.
Cold Water Benefits : थंड पाण्याने चेहरा धुतल्यास होतील ‘हे’ फायदे!
प्रत्यार्पणाद्वारे गुन्हेगाराला खटल्यासाठी आणि शिक्षेसाठी परत आणता येते, ज्यामुळे गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा होऊ शकते. प्रत्यार्पण गुन्हेगारांना दुसऱ्या देशात पळून जाण्यापासून रोखतं, ज्यामुळे गुन्हेगारी कमी व्हायला मदत होतं. प्रत्यार्पणामुळे देशांमधील संबंध सुधारतात, कारण ते गुन्हेगारीच्या समस्यांवर एकत्र काम करतात.