मुंबई : सध्या बाहेर कुठेही बाहेर पडायचं झालं तरी चेहरा, अंग झाकेल असे कपडे घालूनच बाहेर पडावं लागतंय. अशा वेळी त्वचेच्या मदतीला येतं ते सनस्क्रीन लोशन. पण, ते कसं निवडायचं, याविषयी आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.
Mumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ
सनस्क्रीन निवडताना सगळ्यात आधी SPF किती आहे, ते पाहायचं. सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी SPF 30 पेक्षा जास्त असणारं सनस्क्रीन निवडा. शक्यतो, SPF 50 आणि त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम. यासोबत तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकाराला लक्षात घेऊन सनस्क्रीनची निवड करा. म्हणजे, ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांनी तेलाचा अंश कमी असणारं सनस्क्रीन निवडावं, तर संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी पॅराबीन फ्री लोशन निवडावं.
चेहरा, कान, गळा, मान, हात, पाय अशा सूर्याच्या थेट संपर्कात येणाऱ्या अवयवांवर सनस्क्रीन लावा. बाहेर निघण्यापूर्वी १५ ते २० मिनीटं आधी सनस्क्रीन लावणं उत्तम ठरेल. कारण, २० मिनिटांनंतर ते काम सुरू करतं. तसंच, जर खूप घाम येत असेल तर दर दोन ते तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावायला विसरू नका.