Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीमंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती

मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. मंदिर तोडक कारवाईनंतर निघालेल्या मोर्चानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नवनाथ घाडगे यांच्या हकालपट्टीचा आदेश काढला.

वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगे यांच्या आदेशाने पालिका कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने दिगंबर जैन मंदिरावर तोडक कारवाई केली होती. याच मंदिर तोडक कारवाई प्रकरणी जैन समाजाच्या लोकांनी विलेपार्लेपासून अंधेरी पूर्वमधील पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महापालिकेने या अधिकाऱ्यावर कारवाई केली.

मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात दिगंबर जैन मंदिरावर पालिकेने तोडक कारवाई केली. त्याविरोधात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाजाने धडक मोर्चा काढला. जैन मंदिरावर कारवाई केलेल्या वॉर्ड ऑफिसरवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पालिकेचे सहाय्यक आयुक्त म्हणून अंधेरी के/पूर्व विभागात नवनाथ घाडगे यांची दहा दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली होती. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या तयारीसाठी सुवर्णसंधी; एसएसबी कोर्ससाठी मोफत प्रशिक्षण

विले पार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई दरम्यान जैन धर्मियांचे धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्तावर फेकल्याचा आरोप करण्यात आला. धार्मिक पुस्तक आणि धार्मिक वस्तू बाहेर काढल्यानंतर कारवाई करावी अशी विनंती केल्याचा दावा काही जैन समाजातील लोकांनी केला. जैन धर्मियांच्या विनंतीला मान न देता पालिकेने जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई केल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे. तसेच ज्या ठिकाणी जैन मंदिर होते, त्या ठिकाणी ते पुन्हा बांधून देण्याची मागणी जैन धर्मियांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाकडून जैन मंदिर तोडक कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.

ही कारवाई करत असताना जैन धर्मगुरुंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. आम्ही या सर्व गोष्टीचा निषेध करत आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आम्ही एवढाच सांगतो की, यापुढे अशा मंदिरांवर कारवाई होत असेल तर आपण यामध्ये लक्ष घालावे. आमची अशी अनेक मंदिरे तोडली आहेत. एका हॉटेलवाल्याने आमच्यावर कारवाई केली. यामध्ये अनेक मोठे राजकारणी देखील सहभागी आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जैन समाज महाराष्ट्रभर एकवटला आहे, असं आंदोलनावेळी उपस्थित असणाऱ्या जैन धर्मगुरुंनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -