
कल्याण : वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने (KDMC) कल्याणमधील सहजानंद चौकात सौरऊर्जेवर चालणारा पोर्टेबल ट्राफिक सिग्नल बसवला आहे.
हा अभिनव उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत असून, पाच मार्गांचे हे जंक्शन एक महिनाभर या सिग्नलद्वारे वाहनांच्या हालचालीवर लक्ष ठेवणार आहे. यानंतर गोळा झालेल्या माहितीनुसार, महापालिका कायमस्वरूपी उपाययोजना राबवणार आहे.
/>
या सिग्नलची मुख्य खासियत म्हणजे तो सौरऊर्जेवर चालतो तसेच त्याचे स्थान गरजेनुसार हलवता येते. त्यामुळे वाहतुकीच्या उत्तम निरीक्षणासाठी तो योग्य ठिकाणी सहजपणे बसवता येतो. KDMC च्या या उपक्रमामुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक सुसूत्र होण्याची अपेक्षा आहे.