Saturday, May 10, 2025

मजेत मस्त तंदुरुस्तताज्या घडामोडी

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. डॉक्टरांच्या माहितीनुसार आपले आरोग्य ठणठणीत आहे, पण आपण किती वर्ष जगणार हे कोणालाही माहित नसतं. मात्र यामागे आपली नखे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपली नखेच आपण किती वर्ष जगणार हे सांगू शकतात. एका संशोधनानुसार नखांवरून आपलं आरोग्य कसे आहे हे जाणून घेणं शक्य झालं आहे. डॉ. डेव्हिड सिंक्लेअर यांनी एका अभ्यासातून असा दावा केला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या नखांची वाढ आणि आरोग्य हे सांगतं की, तो किती काळ जगणार आहे.

हार्वर्डचे डॉ. डेव्हिड सिंक्लेअर यांच्या संशोधनानुसार तुमची नखे लवकर वाढत असतील तर ते एक सकारात्मक लक्षण आहे. कारण याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात नवीन पेशी तयार होत असून वृद्धत्व कमी वेगाने होत आहे, म्हणजेच तुम्ही जास्त काळ जगणार आहात. तर, दुसरीकडे तुमच्या नखांची वाढ हळूवार होत असेल तर तुमचं वय वेगाने वाढत असल्याचं लक्षण मानलं जातं. या संशोधनानुसार याचा अर्थ तुम्ही जास्त काळ जगणार नाहीत. त्यामुळे या लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं.


नखांच्या वाढीवरून समजे तुमचे आरोग्य कसे आहे ते?


डॉ. सिंक्लेअर यांनी त्यांच्या पॉडकास्ट लाईफस्पॅनमध्ये हा धक्कादायक खुलासा केला असून जो आनुवंशिकता आधारित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जेव्हा शरीर निरोगी असते तेव्हा नखे ​​जलद वाढतात कारण त्याच प्रथिने पोषक तत्वांचा पुरेसा पुरवठा होतो, असं वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलं जातं. यावरून असे दिसून येते की तुमचे शरीर आतून मजबूत असून हळूहळू वयाच्या परिणामांना तोंड देत आहेत.

डॉ. सिंक्लेअर यांच्या मते, नखांची वाढ तुमच्या आहारावर, झोपेवर आणि व्यायामाच्या पातळीवर देखील अवलंबून असल्याचा दावा केला आहे. निरोगी जीवनशैलीमुळे नखे जलद वाढण्यास मदत मिळत असते. त्यामुळे वेळेवर झोपणे, ताण कमी करणे आणि नियमित व्यायाम करणे हे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींमुळे तुमचे नखे निरोगी राहतील आणि तुमचे दीर्घायुष्य होण्याची शक्यता वाढण्यास मदत मिळू शकते.

 
Comments
Add Comment