Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीMumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ

Mumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमधील तापमानात (Mumbai Weather Temperature) सातत्याने वाढ होत असून वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या (Mumbai News) धारांनी हैराण झाले आहेत. घामामुळे नागरिकांना त्वचाविकाराचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील महिनाभरामध्ये नागरिक बुरशीजन्य व जीवाणूजन्य आजाराने त्रस्त झाले (Skin Diseases) असून, त्वचाविकारांच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Best Bus : ‘बेस्ट’ बस का पडतेय आजारी ?

दरवर्षी उन्हाळ्यात घामामुळे (Summer Heat) नागरिकांना त्वचाविकार होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. त्याचबरोबर नागरिकांना त्वचारोगांचाही सामना करावा लागत आहे. बुरशीजन्य व जीवाणूजन्य विकारांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांच्या अंगावर लाल रंगाचे पुरळ येण्याबराेबरच कमरेवर, जांघेमध्ये, काखेमध्ये, हात व पायावर घामोळे व पुरळ येण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील महिनाभरामध्ये या रुग्णांच्या संख्येत ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील नागरिक जीन्ससारखे कपडे घालत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य विकार होत आहे. वाढत्या तापमानामुळे सनबर्न होण्याचे प्रमाणही वाढल्याची माहिती ज्येष्ठ त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. तुषार जगताप यांनी दिली.

प्रचंड उष्णतेमुळे नागरिकांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येतो. हा घाम शरीरावर साचून राहिल्याने घाणेंद्रिये बंद होतात. घाणेंद्रिये रोजच्या रोज पाण्याने स्वच्छ न केल्यास त्वचेचे विकार होण्यास सुरुवात होते. मुंबईमधील वाढत्या तापमानामुळे शरीरातून निघणाऱ्या घामामुळे नागरिक हैराण झाले आहेत. घामामुळे निर्माण होणाऱ्या त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत जानेवारीच्या तुलनेत एप्रिलमध्ये वाढ झाली आहे. प्रामुख्याने बुरशीजन्य रोग, घामोळे आणि उबाळू आलेल्या रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयातील त्वचाविकार विभागातील डॉक्टरानी दिली.

लहान मुलांच्या अंगावर वाढले सफेद डाग 

लहान मुले सतत उन्हात खेळत असल्याने त्यांना प्रचंड घाम येतो. त्यामुळे त्यांच्या अंगावर सफेद डाग दिसत आहेत. हे डाग साधारणपणे मानेवर किंवा चेहऱ्यावर जास्त प्रमाणात दिसतात. मात्र काही वर्षांपासून ते पाठीवर दिसू लागले आहेत. वाढत्या उन्हामुळे येणाऱ्या घामामुळे अंगातील तेलकटपणा वाढत असल्याने शिबळे येण्याच्या प्रमाणात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याने शिबळे येण्याच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता त्वचाविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -