
/>
मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२५ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात शुक्रवारी १८ एप्रिल २०२५ रोजी पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड,विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद , प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी व इतर मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
/>
यंदाचे वर्ष हे प्रशिक्षण वर्ष म्हणून घोषित केले आहे. कांदिवली येथे सुरू होणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात अग्निकवायती होतील. नागरिकांचे प्राण वाचवत असताना स्वत:चीही तेवढीच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी जवानांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच जवानांच्या सुरक्षेवरही भर देण्यात येईल, असेही डॉ. सैनी यांनी नमूद केले.
चित्रपट अभिनेते सोनू सुद यांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक करताना, लाखो लोकांचे प्राण वाचवणारे मुंबई अग्निशमन दलाचे जवान हेच खरे नायक (हिरो) असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, अग्निशमन दलाच्या अग्निकवायती या प्रोत्साहित करणाऱ्या आहेत. या दलाची सज्जता कौतुकास्पद आहे. नोकरी करण्यासाठी अनेक क्षेत्रे आहेत. परंतु, अग्निशमन दलासारख्या क्षेत्रात लोकांचे प्राण वाचविण्याची संधी मिळते. हेच कार्य मुंबई अग्निशमन दलाचे जवान समर्पित भावनेने करत आहेत, असे कौतुकाचे शब्दही सोनू सूद यांनी काढले.
प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी प्रास्ताविक केले. अग्निशमन सप्ताह निमित्ताने १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२५ या कालावधीत अग्निसुरक्षा जनजागृतीसाठी मुंबई अग्निशमन दलाकडून मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी माहिती दिली.
राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवापदक प्राप्त प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक घोष, दुय्यम अग्निशमन अधिकारी सुनील गायकवाड, प्रमुख अग्निशमक पराग दळवी, प्रमुख अग्निशमक तातू परब यांचा डॉ. अमित सैनी आणि अभिनेता सोनू सूद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रात्यक्षिक स्पर्धेतील विजेते
फायर पंप ड्रिल स्पर्धा
प्रथम क्रमांक - गोवालिया टॅंक अग्निशमन केंद्र
द्वितीय क्रमांक - मुलुंड अग्निशमन केंद्र
तृतीय क्रमांक - नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा
प्रथम क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र
द्वितीय क्रमांक - भायखळा अग्निशमन केंद्र
तृतीय क्रमांक - मरोळ अग्निशमन केंद्र
फायर पंप ड्रिल स्पर्धा (महिला)
प्रथम क्रमांक - विक्रोळी अग्निशमन केंद्र
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा (महिला)*
प्रथम क्रमांक – नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र
द्वितीय क्रमांक - विक्रोळी अग्निशमन केंद्र
सर्वोत्कृष्ट संघ
फोर्ट अग्निशमन केंद्र
सर्वोत्कृष्ट अग्निशामक
केंद्र अधिकारी अमोल मुळीक