
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे मत
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हे तंत्रज्ञान न्याय व्यवस्थेत क्रांती घडवू शकते आणि प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते, असे प्रतिपादन बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांनी केले.
महाराष्ट्र राज्य बार कौन्सिलतर्फे आयोजित केलेल्या "कृत्रिम बुद्धिमत्तेचा न्यायव्यवस्थेवर परिणाम" या विषयावर प्रादेशिक वकिलांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, तसेच न्यायमूर्ती एम. एस. सोनक, ए. एस. गडकरी आणि एम. एस. कर्णिकही उपस्थित होते.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार २० एप्रिल २०२५ रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. ...
न्यायमूर्ती सुंदरसन म्हणाले, “एआयचा वापर करून विविध प्रकरणांतील समान मुद्दे मशीनद्वारे सहज शोधता येऊ शकतात. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहणात झालेल्या गणनात त्रुटी असलेल्या प्रकरणांत समान निवारण देता येईल. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या केसेस वेगाने निकाली काढता येतील.”
ते पुढे म्हणाले, “कर कायद्याच्या अर्थ लावण्यासंदर्भातील याचिकांमध्ये समान प्रश्न उद्भवतात, ते ओळखून AI च्या सहाय्याने एकत्र निर्णय घेता येऊ शकतो.” मात्र, त्यांनी यावेळी इशारा देत सांगितले की, AI चे धोकेही आहेत. मानवतेचा न्यायासाठी आवश्यक असलेला "समता भाव" यंत्रांमध्ये नसतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
AI च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर वकिलांनी या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं. न्यायप्रक्रियेच्या कार्यक्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी AI हे महत्त्वाचे साधन ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.