
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट
शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं जीवनच पालटतं, अशा साईनाथांच्या चरणी पुन्हा एकदा एका भक्ताने भक्तीचा अनमोल नजराणा अर्पण केला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील एका भक्ताने तब्बल ६८ लाख रुपये किंमतीचा सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला. या मुकुटाचे वजन आहे ७८८.४४ ग्रॅम, आणि त्यावरील आकर्षक नक्षीकाम साईभक्तीच्या गहिर्या भावनांचे प्रतीक आहे.
या संदर्भात माहिती देताना श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, हा सुवर्ण मुकुट शनिवार, १९ एप्रिल २०२५ रोजी साईचरणी अर्पण करण्यात आला. आणि या नव्या अर्पणामुळे साई संस्थानकडे असलेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. डॉक्टरांच्या माहितीनुसार आपले आरोग्य ठणठणीत आहे, ...
शिर्डी हे केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती श्रद्धेचा महासागर आहे. ज्याला कोणीही पार करू शकत नाही… इथं आलेला प्रत्येकजण आपली वेदना, आपली आशा, आपली प्रार्थना साईचरणी अर्पण करून जातो – आणि त्या बदल्यात मिळते अंतःकरणाला शांती, समाधान.
शिर्डी हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं श्रीमंत देवस्थान असून देश-विदेशातून कोट्यवधी भाविक इथे दररोज येतात. केवळ सुवर्ण मुकुटच नव्हे, तर सोने, चांदी, हिरे, मौल्यवान वस्तू आणि रोख स्वरूपातील देणग्यांचा वर्षाव साईबाबांच्या चरणी सातत्याने होत असतो.
अशा या अद्भुत भक्तीच्या ओढीमुळे, साईंचं मंदिर केवळ संगमरवरी चौकटीत बांधलेलं स्थान न राहता, ते लाखो लोकांच्या हृदयात खोलवर कोरलं गेलेलं श्रद्धास्थान बनलं आहे.
"साईंच्या कृपेनं सगळं मिळतं, मग आपण जे काही मिळवलं, ते त्यांच्या चरणी अर्पण केल्याशिवाय पूर्णत्व येत नाही" – ही भावना त्या भक्ताच्या देणगीतून प्रत्ययास येते.