Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीDelhi Building Collapsed : नागरिक गाढ झोपेत असतानाच पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत!

Delhi Building Collapsed : नागरिक गाढ झोपेत असतानाच पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत!

४ जणांचा मृत्यू; १० जण अडकल्याची शक्यता

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील (New Delhi) मुस्तफाबाद परिसरात मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक चार मजली इमारत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना (Delhi Building Collapsed) घडली. तसेच दहाहून अधिकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ (Delhi NDRF) टीम आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु करण्यात आले. मात्र नागरिक गाढ झोपेत असतानाच पत्त्याच्या बंगल्यासारखी इमारत कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये ही घटना घडली. रात्री २ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास अग्निशमन दलाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य दरम्यान, बाहेर काढण्यात आलेल्या १० जणांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला. बचावकार्य अद्याप सुरु असून ढिगाऱ्यात अजूनही ८ ते १० लोक अडकले असण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली असलेल्या ४ जणांचा मृत्यू झाला. बचाव कार्य अजूनही सुरू आहे. घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इमारत कोसळली त्या ठिकाणी दोन पुरुष आणि महिला राहतात. मोठ्या महिलेला तीन मुले आहेत, दुसऱ्या महिलेलाही तीन मुले आहेत. आम्हाला सध्या काहीही माहिती नाही. ते कुठेही दिसत नाहीत. (Delhi Building Collapsed)

इमारत कोसळण्याचे कारण काय?

शुक्रवारी दिल्लीतील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे रात्री मुसळधार पाऊस आणि वादळ आले. त्यामुळे शहराच्या अनेक भागांवर परिणाम झाला. त्यामुळेही इमारत कोसळल्याची शक्यता आहे. तसेच मागील आठवड्याच्या सुरुवातीला देखील दिल्लीतील मधु विहारमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत पडल्याची घटना घडली होती. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -