Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

Mumbai : पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास करा

मुंबई (खास प्रतिनिधी) : दरवर्षी काही प्रमाणात शहरात नवीन पाणी साचण्याची ठिकाणे निर्माण होत असली तरी काही पारंपारिक पाणी साचण्याच्या ठिकाणांचा अभ्यास केला तरच त्यावर अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाऊ शकतात. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अशा ठिकाणांवर साचणाऱ्या पाण्याची तीव्रता कमी करणे हा महानगरपालिकेचा उद्देश असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद करत महापालिकेच्या संबंधि विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

माहिमच्या दिलीप गुप्ते यांच्या नावासमोर लेफ्टनंट लिहायचा महापालिकेला विसर

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्‍या पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागामार्फत विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने अतिवृष्टीच्या वेळी पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील पाणी साचण्याच्‍या ठिकाणांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी १८ एप्रिल २०२५ रोजी पाहणी केली. तसेच, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. मानखुर्द – महाराष्‍ट्र नगर येथील भुयारी मार्ग, चेंबूरस्थित शेल कॉलनी येथील भुयारी मार्ग, नाला, टेंभे पूल, कुर्ला जंक्‍शन येथील स.गो. बर्वे मार्ग येथील चंद्रोदय सोसायटी यांसह शहर विभागातील चुनाभट्टी रेल्‍वे स्‍थानक, हिंदमाता पावसाळी पाणी साठवण टाकी (होल्डिंग पॉण्ड) इत्यादी ठिकाणी बांगर यांनी पाहणी दौरा केला. प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्रीधर चौधरी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते या दौ-यास उपस्थित होते.

अग्निसुरक्षेसाठी मुंबई अग्निशमन दल सुसज्ज

चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिका अधिकारी यांनी हायड्रोलिक सर्वेक्षण करून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मानखूर्द महाराष्ट्र नगर येथील भूयारी मार्गाच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, टेंभी पूल परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा सुनियोजितपणे होण्यासाठी नियोजन करावे तसेच हिंदमाता उदंचन केंद्राचे परिचलन अधिक परिणामकारक व्हावे, यासाठी दक्ष रहावे. याठिकाणी फ्लो मीटर बसवावेत. सातही पंपांची क्षमता एकसमान करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

मुंबईत झाडांचे ऑपरेशन, ३३० झाडांची मुळे झाली मोकळी; १६७३ झाडांना केले वेदनामुक्त

यंदाच्या पावसाळ्यात पाणी निचरा वेगाने होण्यासाठी त्या ठिकाणी अतिरिक्त उदंचन यंत्रणा (पंप) स्थापन करावी. तसेच पर्जन्य जल उपसा करणाऱ्या पंपांना आयओटी (Internet of Things) तत्वावर आधारित तंत्रज्ञानाची जोड देत सेन्सर बसवावेत. या सेन्सर्सची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वास्तविक वेळ मिळावी, जेणेकरून पंप सुरू आहे की नाही याची माहिती त्याचवेळी उपलब्ध होऊ शकेल, असेही निर्देश बांगर यांनी दिले.

मुंबईतील ९ जलतरण तलावांमध्ये सभासद होण्याची सुवर्णसंधी

शहर भागातील हिंदमाता या सखल भागातील पाणी निचरा व्यवस्थेची बांगर यांनी पाहणी केली. हिंदमाता येथील जल साठवण टाकी, सात उपसा पंप, मुख्य जलवाहिनी, प्रमोद महाजन उद्यानातील साठवण टाकी, सेंट झेव्हियर्स मैदान येथील साठवण टाकी यांच्या जल साठवण प्रक्रियेचा आढावा घेत महत्वपूर्ण सूचना बांगर यांनी केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -