
अमरावती : राज्यभरात उन्हाचा कडाका (Summer Heat) वाढत चालला असून उन्हाच्या वाढत्या झळांसह नागरिकांना पाण्याची गरज भासत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात अमरावतीकरांवर पाणीसंकटाचा (Water Shortage) सामना करावा लागत आहे. अमरावती व बडनेरा शहरात पाणीगळतीची समस्या सुरु असल्यामुळे येथील पाणीपुरवठा दोन दिवस बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Amravati Water Supply)

नवी मुंबई : सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्या की शासकीय कर्मचारी सहलीसाठी पळ काढतात अथवा गावी जातात, असा सर्वसामान्यांमध्ये समज प्रचलित आहे. पण गुड ...
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती व बडनेरा शहरात पाईपलाईनमधून होत असलेल्या पाणी गळतीचा दोष दुरूस्तीच्या अनुषंगाने शहराचा पाणीपुरवठा २३ व २४ एप्रिलला पूर्णतः बंद राहणार आहे.अमरावती पाणीपुरवठा योजनेच्या निरपिंगळाई बीपीटीपासून येणारी २५ मीमी व्यासाच्या पीएससी गुरूत्ववाहिनीमधून नांदगाव ते माहुली गावाच्या मध्ये पाणीगळती होत आहे. हा दोष दुरूस्त करण्याकरिता २२ ते २३ एप्रिल रोजी अमरावती व बडनेरा हरातचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Amravati Water Supply)
पाणीगळती दोष त्वरित दुरूस्त करण्यात येऊन पाणी पुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. तरीपण नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून साठवून ठेवावे, असे आवाहन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.