
पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेखला अटक केली आहे. काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी नॉट रिचेबल झाले आहेत.
नाशिकमधील हिंसेप्रकरणी १५०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींमध्ये काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, उद्धव गटाचे निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हाजी यांचाही समावेश आहे. या आरोपींच्या विरोधात कट रचणे, अफवा पसरवणे, प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष हिंसाचार घडविण्यात सहभाग असल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दर्ग्यावरील कारवाईला विरोध म्हणून पोलिसांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये २१ पोलीस जखमी झाले होते. अनेक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. दंगल करणाऱ्यांनी ३० वाहनांची नासधूस केली. घातक शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, विटा आणि फरशांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात मोबाइल व्हिडीओ, परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.