'रस्त्यांचा विकास करताना झाडे वाचवावीत', अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले निर्देश

  50

मुंबई : रस्ते काँक्रिटीकरण करताना ड्राय लीन काँक्रिटचा थर टाकला जातो. त्याची योग्यता तपासण्यासाठी सर्व ठिकाणी 'फिल्ड ड्राय डेन्सिटी' चाचणी अनिवार्य आहे. मातीच्या जागेवरील घनता मोजावी आणि माती योग्यरीतीने आकुंचित झाली आहे, हे तपासावे, जेणेकरून रस्त्याची मजबुती आणि भारवहन क्षमता सुनिश्चित होईल, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी यांनी दिले. बोरिवली पश्चिम येथील श्री. अय्यप्पा मंदिर मार्गाच्या काँक्रिट कामात झाडे बाधित होत असल्याचे आढळल्याने रस्त्याचे संरेखन सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत. रस्ते कामाची गती वाढवताना गुणवत्तेचा त्याच्याशी योग्य ताळमेळ साधावा. जे रस्ते हाती घेतलेले नाहीत, त्या रस्त्यांवर खड्डे उद्भवणार नाहीत, याची दक्षता बाळगावी, असे निर्देशही बांगर यांनी दिले.


रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी बुधवारी १६ एप्रिल २०२५ रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक, जोगेश्वरी पूर्व येथील हनुमान नगर, नटवर नगर, गोरेगाव पश्चिम येथील पवनबाग मार्ग आणि बोरिवली पश्चिम येथील अय्यप्पा मंदिर मार्ग येथील कामांचा समावेश होता.या पाहणीवेळी, टप्पा एक आणि टप्पा दोन अंतर्गत प्रभागनिहाय सुरू असलेल्या काँक्रिट रस्ते कामांचा आढावा घेत बांगर यांनी ३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण होणारे काँक्रिटचे रस्ते आणि चौक ते चौक (जंक्शन टू जंक्शन) पूर्ण होऊ शकणारे रस्ते यांची सविस्तर माहिती घेतली.



अहवाल तयार करण्याचे आदेश


पश्चिम उपनगरांत गुरुवारी १५ एप्रिल २०२५ रोजी एकाच दिवशी १०१ रस्त्यांच्या कामात मिळून तब्बल ३ हजार ११६ घनमीटर काँक्रिट टाकण्यात आले. त्याचा आढावा घेत बांगर म्हणाले की, रस्ते कामांची गती वाढली आहे, हे यातून सिद्ध होते आहे. कामांची गती वाढवताना कामांच्या गुणवत्तेशी वेगाचा योग्य ताळमेळ साधावा. जे रस्ते हाती घेतलेले नाहीत, त्या रस्त्यांवर खड्डे उद्भवणार नाहीत, याची दक्षता बाळगावी. अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करून उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावावीत. सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतची (एंड टू एंड) कामे नियंत्रणात असावीत. दैनंदिन अहवाल तयार करावा. काही अडचणी असल्यास तातडीने वरिष्ठांपर्यंत त्या पोहोचवाव्यात, अशा सूचना बांगर यांनी केल्या.



रस्त्यांच्या प्रत्यक्ष कार्यस्थळी पाहणी


पाहणी दौऱ्या दरम्यान सर्व रस्त्यांच्या प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प चाचणी, क्यूब चाचणी याबरोबरच मॉइश्चर कंटेन्ट ऍप्रेटस, फिल्ड ड्राय डेन्सिटी आदी चाचण्या करण्यात आल्या. त्यांचे परिणाम (रिझल्ट) योग्य असल्याचे निदर्शनास आले. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (पश्चिम उपनगरे) संजय बोरसे यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून