Saturday, April 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक...

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवणार

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग अशी ओळख मिरवणाऱ्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर १७ प्रकारचे वाहतूक उल्लंघन शोधण्यासाठी एआय वाहतूक प्रणाली बसवली जाणार आहे. यामुळे ओव्हरस्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, एक्सप्रेसवे किंवा बोगद्यात अनधिकृत पार्किंग, ओव्हरलोडिंग, सीट बेल्ट न लावणे, लेन अर्थात मार्गिकेचे उल्लंघन आदी चुका करणाऱ्यांना स्वयंचलित पद्धतीने दंड आकारला जाईल.

Gold Rate : जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा दर ?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी समृद्धी महामार्गावर ऑप्टिकल फायबर आणि इलेक्ट्रिकल केबल टाकत आहे. आतापर्यंत ५०० किमी. पेक्षा जास्त केबल डक्ट बसवण्यात आले आहेत. प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, आपत्कालीन परिस्थितीत तसेच अपघात झाल्यास तातडीने मदत करणे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे आणि कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह कार्यक्षम टोल वसुलीची खात्री करणे हे आहे.

अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार

समृद्धी महामार्गावर एआय वाहतूक प्रणाली बसवण्यासाठी जुलै २०२४ मध्ये एनसीसी लिमिटेड आणि अॅमनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांना काम देण्यात आले. प्रकल्प देखरेखीसाठी निप्पॉन कोई कंपनी लिमिटेड आणि निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती झाली.

ठाण्यातील इगतपुरी ते आमणे दरम्यानचा समृद्धी महामार्गाचा शेवटचा ७६ किलोमीटरचा भाग महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे २०२५ रोजी सुरू करण्याचे नियोजन आहे. या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करण्याची शक्यता आहे. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार आहे. वेळ आणि पैशांची बचत होणार आहे. कसारा घाटाला बायपास केल्यामुळे आमणे आणि इगतपुरी दरम्यानचा प्रवास वेळ ९० मिनिटांवरून फक्त ४० मिनिटांवर येईल.

सध्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमी. मार्ग कार्यरत आहे. इगतपुरी ते आमणे टप्प्याचे काम झाल्यावर हा ७०१ किमी. चा महामार्ग नागपूर आणि ठाणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ १६ तासांवरुन आठ तासांवर आणेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -