मुंबई(ज्ञानेश सावंत): आयपीएल २०२५ आता बहरत चालली आहे, दिवसेंदिवस ह्या स्पर्धेत चुरस निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. अगदी कालचा सामना घेतला तर शेवटच्या षटकात ९ धावा हे काय २०-२० साठी अशक्य नाही परंतु तो सामना सूपर ओव्हर पर्यंत जाऊन पोचला. आज बेंगलोरच्या चेन्नास्वामी मैदानावर पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स एकमेका समोर उभे ठाकणार आहेत.
दोन्ही संघ आयपीएल मध्ये आता पर्यंत सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्सने अगोदरच्या सामन्यात राजस्थानचा ९ गडी नी पराभव केला तर पंजाबने १११ धावा करून १६ धावांनी कोलकत्ता नाईट रायडर्सवर विजय मिळविला. चेना स्वामी स्टेडियम हे फलंदाजीसाठी उपयुक्त आहे आणि दोन्ही संघामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये असलेले फलंदाज आहेत त्यामुळे आज एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.
आज आपल्याला विराट आणि श्रेयस यांच्यातील द्वंद्व पाहायला मिळेल. दोघेही सध्या आपापल्या संघासाठी फार सुंदर खेळताहेत. चेन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी ही हिटरसाठी प्रसिद्ध आहे. येथे बाउंड्री लाइन जवळ असल्यामुळे जास्त धावा होण्यास मदत होते. ह्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाणा सुरवातीला चांगला बाउंस मिळतो त्यामुळे झटपट विकेट घेण्याची संधी असते.
चला तर बघूया चेन्नास्वामी मैदानावर पंजाबचे शेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला पराभवाचे पाणी पाजतात का?