पुणे : पुण्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या काही जागांपैकी भिडे पूलही समाविष्ट आहे. या पुलावर नेहमीच वर्दळ असते. मात्र हाच भिडेपूल काही कारणास्तव दीड महिना बंद राहणार आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे सतत ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.
Cricketer Sanjay Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीला पाठवले न्यूड फोटो
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा भिडे पूल हा पुण्यातील मध्यवर्ती भागातील मुठा नदीवर वसलेला आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होते. नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
परंतु आता हा भिडे पूल बंद केल्यामुळे नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मेट्रोच्या कामामुळे आपण दीड महिना बंद राहत असल्यामुळे मेट्रो प्रशासनाकडून क्षमस्व अशी पाटी या ठिकाणी लावण्यात आली आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसते आहे. दरम्यान पुणेकरांची गैरसोय न व्हावी यासाठी वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे.