Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीNavi Mumbai : सुट्टीच्या दिवशी महापालिका अधिकारी ज्येष्ठांच्या सेवेसाठी उद्यानात हजर!

Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशी महापालिका अधिकारी ज्येष्ठांच्या सेवेसाठी उद्यानात हजर!

नवी मुंबई : सार्वजनिक सुट्ट्या जोडून आल्या की शासकीय कर्मचारी सहलीसाठी पळ काढतात अथवा गावी जातात, असा सर्वसामान्यांमध्ये समज प्रचलित आहे. पण गुड फ्रायडेच्या (Good Friday) दिवशी सार्वजनिक सुट्टी असताना ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, विकासकामांविषयी ज्येष्ठांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, त्यांना हव्या असलेल्या सुविधांची माहिती करुन घेण्यासाठि महापालिका अधिकारी उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना भेटण्यासाठी आले, त्यांच्याशी तब्बल अडीच तास चर्चा करुन, त्यांना आवश्यक असलेली माहिती देऊन गेल्याची घटना नेरूळ सेक्टर चार परिसरात घडली आहे.

SSC and HSC Result : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी Update

नेरूळ सेक्टर चारमधील महापालिकेच्या (Nerul Municipal Corporation) विभाग कार्यालयासमोरच असलेल्या नेताजी पालकर उद्यानात पालिका प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे काम सुरु झाले असून उद्यान छोटे असल्याने समोरील क्रिडांगणामध्ये हे केंद्र उभारावे अशी मागणी नेरूळ सेक्टर चारमधील ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत होती. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांमध्ये या कामाविषयी काही प्रमाणावर नाराजीचा सूर आळविला जात असतानाच परिसरातील स्थानिक रहीवाशी, कामगार नेते व नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी शुक्रवारी सकाळी पालिकेच्याच उद्यानात पालिकेचे नेरूळ विभाग कार्यालयाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घडवून आणली. यामध्ये स्थानिक परिसरातील महिलांचा समावेश होता. यावेळी नागरिकांसमवेत नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकरही उपस्थित होत्या.

ज्येष्ठ नागरिकांनी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रविंद्र सावंत आणि आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याचे तसेच याप्रकरणी पालिका आयुक्तांचीही भेट घेतल्याचे या बैठकीत कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांना सांगितले. विरंगुळा केंद्र क्रिडांगणात करावे या ज्येष्ठांच्या मागणीवर माहिती देताना उमेश पाटील म्हणाले की, विरंगुळा केंद्र हे उद्यानात असते, तसा धोरणात्मक निर्णय असून प्रत्येक काम हे नियमानुसारच होत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी आपल्या समस्या व असुविधांबाबत उमेश पाटील यांच्याशी चर्चा केली. रविंद्र सावंत यांनी ज्येष्ठ नागरिक केंद्रातील सुविधांविषयी विचारणा केल्यावर, उमेश पाटील यांनी या ठिकाणी असणाऱ्या लायब्ररी, कॅरम व अन्य खेळाचे साहित्य, टीव्ही, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दोन शौचालये यासह अन्य माहिती दिली. तसेच मॉर्निग वॉकच्या जागेपासून पाच फूट जागा सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रवी पुजारी यांनीही विभागातील काही समस्या मांडल्या.

सार्वजनिक सुट्टी असतानाही आपल्या समस्या व असुविधा जाणून घेण्यासाठी तसेच विकासकामांची माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी वेळ दिल्याबद्दल ज्येष्ठांनी त्यांचे आभार मानले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -