Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीमहापालिका बेस्टला देणार एक हजार कोटी रुपये

महापालिका बेस्टला देणार एक हजार कोटी रुपये

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी देण्यासाठी ५०० कोटी रुपये राखीव

मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाला महापालिकेच्यावतीने १ हजार कोटी रुपये देण्याची घोषणा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भुषण गगराणी यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केल्यानंतर प्रत्यक्षात हा निधी देण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीपैंकी शंभर कोटी रुपयांच्या रकमेचा पहिला हप्ता मागील आठ दिवसांपूर्वी देण्यात आली आहे. मात्र, या एकूण एक हजार पैंकी तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी हा केवळ बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेच्या या निधीमुळे बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्व थकीत देणी प्राप्त होत असल्याने एकप्रकारे बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

बेस्ट उपक्रमांची आर्थिक परिस्थिती आणि सार्वजनिक वाहतूकीचे महत्व लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमास त्यांची व्यवस्था सुधारण्यासाठी सहाय्य म्हणून सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण १ हजार कोटी की तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार हा निधी देण्यास महापालिकेची मंजुरी प्राप्त झाली आहे. यातील १०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मागील आठवड्यात बेस्ट उपक्रमाला देण्यात आला असला तरी या एक हजार कोटी रुपयांपैंकी ५०० कोटी रुपये एवढी रक्कम न्यायालयातील निवाड्यानुसार बेस्टच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याकरता राखीव ठेवणे आवश्यक असतील. तसेच या एक हजार कोटी रुपयांच्या तरतुदीमधून, बेस्ट उपक्रमाच्या २००० इलेक्ट्रीक बसगाड्यांचे प्रवर्तन करण्याच्या प्रकल्पाचा खर्चातील मुंबई महानगरपालिकेचा ५ टक्के हिस्सा म्हणजेच १२८.६५ कोटी रुपयांच्या स्वतंत्र प्रस्ताव सादर केला जाईल आणि उर्वरीत ८७१.३५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा निधी महापालिकेच्यावतीने उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने बेस्ट उपक्रमाला देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

पायाभुत विकासासाठी होणार वापर

पाचशे कोटी रुपये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आणि १२८ कोटी रुपयांचे इलेक्टीकल बसेस खरेदीकरता वगळल्यास अन्य उर्वरीत रक्कम ही बेस्टला पायाभूत विकास आणि भांडवली उपकरणे खरेदी, कर्जाची रक्कम परतफेड, भाडेतत्वावरील नवीन बसेस घेण्यासाठी, आयटीएमएस प्रकल्प, बेस्ट उपक्रमामार्फत मे. टाटा पॉवर कंपनी लि. यांना देय असलेली विद्युत देणी तसेच वेतन करारान्वये येणारे आर्थिक दायित्व व दैनंदिन खर्च भागवणे आणि कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान करणे आदींकरता वापरता येवू शकतात.

सेवा निवृत्तांना दिलासा

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी ५०० कोटी रुपये दिले जाणार असले तरी त्यातून सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपदानाचे अधिदान बेस्ट उपक्रमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची विविध देणी भागविण्यासाठी आदींकरताच वापरता येणार आहे. त्यामुळे एकप्रकारे बेस्टच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांकरता दिलासा देणारी ही बाब आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -