मुंबई : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू झालेल्या व्यापार युद्धाचा आणि रशिया – युक्रेन लढाईचा आंतरराष्ट्रीय बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेकांनी सोन्याकडे बघायला सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याची किंमत आता ९७ हजार ३२० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
मुंबईत आज म्हणजेच शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी २४ कॅरेट शुद्ध १० ग्रॅम सोन्याचा दर अर्थात २४ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा सोन्याचा दर ९७ हजार ३२० रुपये झाला आहे. तसेच मुंबईत आज २२ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा सोन्याचा दर ८९ हजार २१० रुपये झाला आहे. मुंबईमध्ये आज १८ कॅरेट शुद्ध असलेल्या एक तोळा सोन्याचा दर ७३ हजार रुपये झाला आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम : भारताचे जीडीपी वाढीचे अनुमान घटून ६.५ टक्के
ज्यांच्यासाठी सोन्यातली गुंतवणूक सध्याच्या प्राधान्यक्रमात नाही असे अनेक गुंतवणूकदार गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून चांदीकडे बघत आहेत. यामुळे चांदीची किंमत ९९ हजार ९०० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. मुंबईत आज म्हणजेच शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी एक हजार ग्रॅम अर्थात एक किलो चांदीचा दर ९९ हजार ९०० रुपये झाला आहे.
भारतीय संस्कृतीत सोन्याचांदीला महत्त्व आहे. यामुळे भारतीय गुंतवणूकदार दरवर्षी मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीत गुंतवणूक करत असतात. गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते सध्या सोनं आणि चांदी हे दोन्ही धातू गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि चांगले पर्याय आहेत.