Friday, May 9, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Kesari 2 Review : अक्की इज बॅक! अक्षय कुमारचा ‘केसरी २’ चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले...

Kesari 2 Review : अक्की इज  बॅक! अक्षय कुमारचा ‘केसरी २’ चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित कोर्टरूम ड्रामा ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट आज (१८ एप्रिलला) जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारने प्रसिद्ध वकील शंकरन नायरची भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. करण सिंह त्यागी दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित, या चित्रपटात आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्याही मुख्य भूमिका आहेत.


‘केसरी चॅप्टर २’ १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे, तर आर माधवन ब्रिटीश वकिलाच्या आणि अनन्या पांडे दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट रघु पलट आणि पुष्पा पलट यांच्या ‘द केस दॅट शूक द एम्पायर’ या पुस्तकावर आधारित आहे. ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट नेमका कसा आहे, त्याबद्दल प्रेक्षकांनी पोस्ट केल्या आहेत. ‘केसरी चॅप्टर २’ पाहिल्यावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर रिव्ह्यू केले आहेत.



Kesari Chapter २ हा फक्त एक चित्रपट नाही, तर आपण काय गमावलं आणि आपण काय विसरता कामा नये, याची आठवण करून देणारा सिनेमा आहे, असं समीक्षक तरण आदर्श यांनी लिहिलंय. त्यांनी या चित्रपटाला ४ स्टार रेटिंग दिले आहे.




अक्षय कुमारने त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय केला आहे, माधवनने अप्रतिम काम केलंय आणि करण सिंह त्यागीचे दिग्दर्शन कमाल आहे. त्याग आणि प्रतिकाराची एक उत्तम कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, असं एका युजरने चित्रपट पाहून लिहिलं आहे.




‘केसरी चॅप्टर २ उत्तम चित्रपट आहे. आर माधवन, अक्षय कुमार, अनन्या पांडे यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. देशभक्तीने ओतप्रोत कोर्टरूम ड्रामा. हा चित्रपट नक्की पाहा,’ असं एका युजरने म्हटलं आहे.

Comments
Add Comment