Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!

JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!

मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल (दि १७) ही उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. आता पुन्हा उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या जेईई मेन सत्र २ च्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका एनटीएने काल (दि १७) अंतिम उत्तरपत्रिका जारी केली होती परंतु नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकली, त्यानंतर विद्यार्थ्यांना असे का केले गेले? हा प्रश्न पडला होता. मात्र काही विद्यार्थ्यांनी उत्तरं पत्रिकेबाबत आक्षेप नोंदवले होते आणि एनटीएला ईमेल केला होता. त्यामुळेच एनटीएने ही उत्तरपत्रिका हटविण्यात आली होती. आज (दि १८) दुपारी २ च्या सुमारास पुंन्हा अंतिम उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे.





तसेच १९ एप्रिलला म्हणजेच शनिवारी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं एनटीएने जाहीर केलं आहे. दरम्यान जेईई मेन सत्र २ परीक्षेसाठी बसलेले आणि उत्तरंपत्रिकेची आणि निकालाची आतुरतेने वाट पाहणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर याबाबत माहिती तपासू शकतात.

Comments
Add Comment