मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत आहे. संजय बांगर याचा मुलगा अनय बांगर याने काही दिवसांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. आता अनय बांगरचे रुपांतर अनाया बांगरमध्ये झाले आहे. संजय बांगरच्या या मुलीने एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक आरोप केले आहेत. अनायाने क्रिकेटविश्वाची एक काळी बाजूच समोर आणली आहे.
बराच काळ लंडनमध्ये राहिल्यानंतर अनाया भारतात आली आहे. भारताच येताच तिने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत एक मोठा भारतीय क्रिकेटर माझ्याशी संबंध ठेवू पाहत होता. तर काही खेळाडू मला घाणेरडे फोटो पाठवायचे. काही क्रिकेटर तर मला सर्वांसमोर शिवीगाळ करायचे. नंतर मला फोटो मागायचे, असं अनायाने सांगितलं. जेंडर चेंज केल्यानंतर माझ्या वडिलांनी मला क्रिकेट सोडण्याचा सल्ला दिला. तुला क्रिकेट सोडलं पाहिजे.
‘लल्लनटॉप बैठकी’ में इस बार हमारी मेहमान हैं सोशल मीडिया इंफ्लुएंसर अनाया बांगर. अनाया पहले आर्यन बांगर के नाम से जानी जाती थीं. इस इंटरव्यू में उन्होंने ट्रांस महिला के रूप में अपने अनुभव साझा किए. बिना कहे न्यूड तस्वीरें भेजने वाले खिलाड़ी और एक वरिष्ठ क्रिकेटर की डिमांड. अनाया… pic.twitter.com/c15j8R6IYN
— The Lallantop (@TheLallantop) April 17, 2025
आता क्रिकेटमध्ये तुझ्यासाठी काहीच जागा उरली नाही, असं वडिलांनी म्हटल्याचं अनाया म्हणते. अनाया बांगरने व्यक्त केले की, तिला याचे दुःख आहे की महिलांच्या क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर्सना खेळण्याची परवानगी नाही. तिची टेस्टोस्टेरॉन पातळी ही सामान्य मुलीप्रमाणेच आहे, तरीही तिला महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी दिली जात नाही, याची खंत तिने व्यक्त केली.