मुंबई : मुंबईतील (Mumbai News) चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ एका इलेक्ट्रिक बेस्ट बसला आग (Best Bus Fire) लागल्याची घडना घडली. अचानक पेट घेतलेल्या या बसमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Today Mumbai Metro Timetable : मुंबई मेट्रो ३ च्या गाड्यांचा आज लेट मार्क!
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ९ वाजून ५० मिनिट ते १० वाजून ३१ मिनिटांच्या सुमारास चर्चगेट स्टेशनजवळील महर्षी कर्वे मार्गावर बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) बसला आग लागली. बस चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ बाहेर थांबलेली असताना अचानक पेट घेतला. दरम्यान या बसमध्ये ८ प्रवासी प्रवास करत असून आगीची घटना घटताच प्रवाशांमध्ये एकच धावपळ झाली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असून सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. (Churchgate Bus Fire)
आगीची घटना घडताच सावधगिरीचा उपाय म्हणून चर्चगेट स्टेशनवरील प्लॅटफॉर्म ४ रात्री ९ वाजून ५० मिनिट ते १० वाजून ३१ मिनिटांदरम्यान बंद करण्यात आला होता. यावेळी चर्चगेट स्थानकावेळी केवळ तीन प्लॅटफॉर्म कार्यरत होते. आग विझवल्यानंतर सर्व प्लॅटफॉर्मवर प्रवेश पुन्हा सुरू करण्यात आला. तसेच या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. (Churchgate Bus Fire)