Saturday, April 19, 2025
Homeताज्या घडामोडीTATA Hospital : टाटा रुग्णालयातील डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी!

TATA Hospital : टाटा रुग्णालयातील डॉक्टरांची कौतुकास्पद कामगिरी!

अवघ्या ४ वर्षांच्या मुलीला मरणाच्या दारातून परत आणले

मुंबई : टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ४ वर्षाच्या चिमुकलीला मरणाच्या दारातून परत आणले आहे. हृदयात छिद्र असलेल्या चार वर्षाच्या मुलीला टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले आहे. अवघ्या लहान वयात जडलेल्या आजारातून चिमुकलीला बाहेर काढल्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले जात आहेत.

Today Mumbai Metro Timetable : मुंबई मेट्रो ३ च्या गाड्यांचा आज लेट मार्क!

मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली येथे राहणाऱ्या मौर्य कुटुंबात २०२१ मध्ये कन्येचं आगमन झालं. परंतु जन्मानंतर अवघ्या १० दिवसांतच तिचा श्वासोच्छवास जलद गतीने होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिला त्वरित जवळच्या डॉक्टरांकडे नेले. २ डी इको चाचणीने चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारांसाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या हृदयात आकाराने मोठे, तसेच त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अवघड असे एक छिद्र आढळले. तिच्या वयोमानासुार या टप्प्यावर खुली शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. त्यामुळे डॉक्टरांनी ती साडेतीन महिन्यांची झाल्यावर तिच्यावर तात्पुरती पीए बँडिंग शस्त्रक्रिया करून हृदयावरील ताण कमी केला. तिच्या हृदयातील छिद्रामुळे तिचे दैनंदिन जगणे अवघड झाले होते. ती फारशी हालचाल न करताही थकायची, तिच्या वयाच्या अन्य मुलांप्रमाणे ती खेळू किंवा धावू शकत नव्हती. तिचा बहुतेक वेळ घरातच जात असे. अन्य मुलांप्रमाणे तिला हसता, खेळता आणि स्वच्छंदपणे जगता येत नसल्याचे मौर्य कुटुंब चिंताग्रस्त होते.

हृदयाला असलेल्या छिद्रामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, वाढ खुंटणे या समस्यांचा चिमुकलीला सामना करावा लागला होता. तिच्या हृदयातील छिद्र बुजविणे आवश्यक होते. पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाला ५ ते ७ दिवस आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवावे लागते. वाडिया रुग्णालयातील बालरोग हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. बिस्वा पांडा यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. क्षितिज सेठ आणि डॉ. जैन यांच्या नेतृत्वाखाली कॅथ लॅबमधील डॉक्टरांच्या पथकाने हायब्रिड तंत्राचा वापर करून तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान या कामगिरीनंतर टाटा रुग्णालयातील डॉक्टरांचे जगभरातून कौतुक होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -